• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शेतीबरोबरच शेतीपुरक व्यवसायातून बसवली आर्थिक घडी

माणगंगा by माणगंगा
October 14, 2022
in महाराष्ट्र
0
शेतीबरोबरच शेतीपुरक व्यवसायातून बसवली आर्थिक घडी

शेतीबरोबरच शेतीपुरक व्यवसायातून बसवली आर्थिक घडी

महेंद्र खोंडे
तऱ्हाडी : नेमके काय करायचे याची स्पष्टता असली की शेती किंवा कोणताही पूरक व्यवसाय यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. शेतीला जोड म्हणून केलेल्या पशुपालन व्यवसायातून शिरपुर तालुक्यातील तऱ्हाडी येथील शेतकरी माधव सोनू बागुल यांनी आपल्‍या शेती आणि उत्पन्नाची घडी बसवली आहे. शेती सुपीक आणि शाश्वत करण्यासाठी त्यांचे गाय, शेळी व कोंबडीपालन अनेकार्थाने महत्त्वाचे ठरत आहे.

त्यांनी शेतीला जोड म्हणून सुरवातीला शेळीपालनास सुरवात केली. त्यात शेळ्यांची निवड, योग्य खाद्य व्यवस्थापन, आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार बोकड आणि लेंडी खताच्या विक्रीतून त्यांना चांगला आर्थिक नफा होत आहे. पशुपालनाच्या नफ्यातून त्यांनी शेतीमध्येही सुधारणा केली आहे. त-हाडी येथील माधव सोनू बागुल ह्यांचा प्रमुख व्यवसाय शेती असून निसर्गाचा असमतोल, अधूनमधून पडत असलेल्या दुष्काळ, नापिकीमुळे शेतमालातुन म्हणावं तसं उत्पन्न मिळत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यात गावांत व परिसरात बऱ्याच वर्षांपासून सतत विपरीत स्थिती निर्माण झाल्यामुळे शेती व्यवसाय पुरताच मंदावल्याने कुटुंब चालवणे अवघड झाले. त्यामुळे त्यांनी उत्पन्नासाठी काय करता येईल, याचा विचार करत असताना त्यांचा मोठा मुलगा भुषण बागुल यांना कमी खर्चाचा शेळीपालन व्यवसाय त्यांच्या डोळ्यासमोर आला. परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा करून यांनी शेळीपालनास सन २०१८ मध्ये सुरवात केली. बागुल यांनी शेतकऱ्यांच्याकडून नऊ शेळ्या व एक बोकड़ विकत घेतला. यासाठी पंच्चावन्न हजार खर्च आला. सुरवातीला शेताच्या बांधावरील चारा, शेतीमध्येही नेपीयर घास गवत याद्वारे बंदिस्त संगोपन सुरू केले. पहिल्या टप्प्यात चांगल्या वजनाची करडे जन्माला येऊ लागली. त्यानंतर त्यांनी वर्षभरात आणखी दहा शेळ्या व एक गाय खरेदी केली अन् त्यामुळे आर्थिक उत्पनातही वाढ होऊ लागली.
असे आहे शेळ्यांचे व्यवस्थापन :
शेळ्यांच्या व्यवस्थापनासाठी दहा बाय चाळीस फुटांचा पूर्व-पश्‍चिम पत्र्याचा गोठा बांधलेला आहे.


गोठ्यात शेळ्यांना पुरेसे पाणी पिण्यास मिळावे, यासाठी मोठ्या आकाराची भांडी पाणी भरून ठेवली जातात. शेळ्या त्यांच्या गरजेप्रमाणे पाणी पितात. दिवसातून दोन वेळा स्वच्छ पाण्याने भांडी भरली जातात बागुल यांनी नंतर संख्या वाढल्याने अर्धबंदिस्त पद्धतीने शेळ्या आपल्या शेताजवळ असलेले डोंगर माथ्यावर, तापी नदी काठी चरावयास नेण्याकरिता चरवाहा मनुष्य देखील लावला आहे. शेळ्यांचे व्यवस्थापन स्वतः माधव सोनु बागुल करतात तसेच मुले भुषण बागुल व शेखर बागुल देखील मदत करतात. भुषण बागुल हे अकाउंट, इन्कम टॅक्स व फायनान्सची कामे सोबत शेती करतात तर शेखर बागुल हे आर. सी. पटेल फार्मसी कॉलेज ला अकाउंटट ची नोकरी करतात. भूषण बागुल नियमित तर शेखर बागुल् सुट्टीच्या दिवशी मदत करत असतात. शेळ्यांना पुरेसा चारा मिळावा यासाठी त्यांनी मका भरडून त्याचे दान तसेच सोयाबीन, हरभरा, तूर, भुईमुग आदि पिकांचे भुस दिले जाते. त्यातून आज त्यांच्याकडे असलेल्या चाळीस शेळ्यांची, चार गायींची दररोजची खाद्याची गरज भागते. प्रत्येक शेळीस दररोज गरजेप्रमाणे हिरवा व कोरडा चारा दिला जातो, तसेच जंतनिर्मूलन केले जाते. करडांना संपूर्ण दूध पाजले जाते. शेळ्यांमध्ये कोणत्याही रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी गोठ्याची स्वच्छता ठेवली जाते. दोन महिन्यांतून एकदा शेळ्या धुतल्या जातात. ह्यासाठी त्यांना पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर ओझरकर व तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर कुंवर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. शेळी पालनाबरोबरच, गायी, गावरान कोंबड्यां, ससे व कबूतर पालन करण्यात आलेले आहे. आवड म्हणून लोक त्यांच्याकडून पाळण्यासाठी ससे व कबूतर देखील खरेदी करतात. त्यांच्याकडे एकुण सर्व पशुपक्षी मिळुन २०० हुन अधिक संख्या आहे.

पशुपालन ठरले आर्थिकदृष्ट्या फायद्याचे…
गेल्या चार वर्षातील पशुपालनातील आर्थिक उत्पन्नाबाबत बागुल म्हणाले, की शेळीपालनात आज पर्यंत पाठी, शेळी व बोकड मिळून शंभर हुन अधिक नग विक्री केले आहेत. बागुल हे करडे वजनावर विक्री करतात सध्या ते जिवंत ४०० रु. प्रती किलो या दराने विकत आहेत. व्यापारी व परिसरातील नागरिक स्वतः गोठ्यावर येऊन करडे, कोंबड्यां, अंडी, दूध, कबुतर व ससे खरेदी करतात. आज घडीला त्यांच्या गोठ्यात एकूण शेळ्यांची संख्या चाळीस आहे. कोरोणाच्या काळात तर त्यांच्या कड़े दोनशे हुन अधिक गावरान कोंबड्या होत्या त्यातच अंड्याची मागनी सर्वाधिक होती. त्यात शिरपुर येथील हॉस्पिटल मध्ये डॉक्टर व पेशंटला मागनी नुसार अंडी उपलब्ध करुणद्यायचे. कोंबड़ी व अंडी विक्रीतून त्यांना आर्थिक सहकार्य होत असे. त्यांच्या कड़े देशी प्रजातीची गाय होती अन त्या गायी पासून चार वर्षात त्यांच्याकडे चार गायी झाल्या. त्यातून त्यांना दूध व शेनखत मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असते. तसेच ससे व कबूतर देखील त्यांच्या कड़े विविध प्रजातिचे उपलब्ध आहेत.
तसेच त्यांनी बांधावर साग, आंबा, आवळा, सिताफळ, निंबु, कडीपत्ता, बांबु, एरंडी व शेवगा असे एकुण ८० हुन अधिक वृक्ष लागवड केली आहे. यावरुन ते किती निसर्गप्रेमी आहेत हे लक्षात येते.


तसेच सेंद्रीय व जैविक शेती करण्यासाठी त्यांची ओळख आहे. ते गाजर, बिट, भेंडी सारख्या दर्जेदार भाजीपाला उत्पादनात देखील त्यांनी शिरपुर् व शहादा मार्केट मध्ये उच्च गुणवत्ते साठी नाव केले आहे. तसेच भूषण बागुल हे आधुनिकतेचा वापर करुण सोशियल मीडियाचा पुरेपुर वापर आपल्या व्यवसायाठी करत आहेत. त्यांनी आपल्या फार्म ला बागुल नाना फार्म असे नाव दिले आहे. त्यांनी आपल्या बागुल नाना फार्म ची वेबसाइड देखील बनवली आहे, ते आपल्या वेबसाइड द्वारे देखील आपली उत्पादने विक्री करतात. तसेच त्यांनी गूगल मैप, फेसबुक, यूट्यूब सारख्या सोशियल मीडिया वर देखील बागुल नाना फार्म चे अकॉउंट बनवून मार्केटिंग करत असतात. बरेच शेतकरी त्यांच्याकडून शेळी पालन चे प्रशिक्षण देखील घेत असतात. बागुल हे आजच्या बदलत्या काळात शेती व पूरक व्यवसाय करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.

सर्व छायाचित्रे महेंद्र खोंडे

Views: 208
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
वूतपत्र विक्रेत्यांच्या कष्टाला आहे का अंत?वूतपत्र विक्रेता दिन १५ ऑक्टोबर

वूतपत्र विक्रेत्यांच्या कष्टाला आहे का अंत?
वूतपत्र विक्रेता दिन १५ ऑक्टोबर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)