आर सी पटेल विद्यालय होळनांथे या शाळेत लेट्स चेंज उपक्रम संपन्न:-
शिरपूर तालुक्यातील होळनांथे येथील आर.सी.पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लेट्स चेंज हा उपक्रम राबवण्यात आला. त्याबाबतीत सविस्तर वृत्त असे की महात्मा गांधी जयंती निमित्ताने मिशन स्वच्छ भारत या मोहिमे अंतर्गत शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्व आपल्या कृतीतून स्पष्ट केले.
लेट्स चेंज या उपक्रमामध्ये विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आणि आपल्या कृतीतून लेट्स चेंज ही संकल्पना साकार केली. सदर उपक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य श्री व्ही.आर. सुतार सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील जेष्ठ शिक्षक श्री डी. ए.जाधव सर यांची स्वच्छता समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली, तसेच विद्यालयातील विद्यार्थी सुमित सुनील राजपूत, प्रथम किरण सिंग राजपूत, नेहा विजय पाटील, दिक्षिता गंगाधर राजपूत या विद्यार्थ्यांची स्वच्छता मॉनिटर म्हणून नेमणूक करण्यात आली. लेट्स चेंज या उपक्रमाचे महत्त्व विशद करताना विद्यालयातील प्राचार्य सुतार सर यांनी विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील समन्वय किती महत्त्वाचा आहे याचे महत्त्व मनोगतातून सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्व व स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी याकरिता लेट्स चेंज ही संकल्पना शासनाने राबवली आहे असे आपल्या मनोगतातून श्री डी.ए. जाधव सर यांनी सांगितले. शाळेतील प्रत्येक वर्गाच्या व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून लेट्स चेंज संदर्भातील लिंक विद्यार्थ्यांपर्यंत पोचवून स्वच्छता मानवी जीवनात किती उपयुक्त आहे हे पटवून देण्यात आले. सदर उपक्रमात विद्यालयातील श्री बी. बी.अग्रवाल सर, श्री सी.जी. पाटील सर, श्री के.व्ही. अहिरे सर, श्री आर. आर.महाजन सर, श्री एम.जी.वाडीले सर, श्री व्ही. एस.मासरे सर, श्री के.पी. पाटील सर, श्रीमती सोनाली पाटील मॅडम यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालयातील श्रीमती कापडणे मॅडम, श्रीमती धनगर मॅडम, वृषाली कासार मॅडम, जागृती जाधव मॅडम, श्री अमोल शिंदे सर, श्री राहुल चौधरी सर, सागर वारुळे सर यांनी सहभाग नोंदविला.
लेट्स चेंज हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माननीय श्री मोहन देसले साहेब हे जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहत आहेत तर जिल्हा समन्वयक म्हणून श्रीमती वासंती पवार मॅडम काम पाहत आहेत.
माननीय जिल्हाप्रमुख व जिल्हा समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यालयाचे प्राचार्य यांच्या सूचनेनुसार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेत आहेत.







