फर्दापूर येथे हरविलेले दोन मोबाईल परत दिले मिळवून
सपोनि देवीदास वाघमोडे यांनी धडाकेबाज कारवाई करून केले मोबाईल परत
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील फर्दापूर येथील मोबाईल हरवला किंवा चोरी झाला अशा बऱ्याच तक्रार पोलीस स्टेशन फर्दापूर यानां प्राप्त झालेल्या होत्या.आपण आधुनिक डिजीटल युगात वावरतांना किंवा समाजमाध्यमांचा वापर करतांना सतर्क राहणे गरजेचे आहे.अशे आपण योग्य ती सर्तकता न बाळगल्यास अज्ञात भामटे आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेवून आपले आर्थिक,वैयक्तिक नुकसान करू शकतात.आजकाल सध्या मोबाईलच्या हरवले व चोरीचे प्रमाण जास्त वाढत आहे.अशीच एक रोजी फर्दापूर येथील तक्रारदार यांनी पोस्टे सायबरवर येथे संपर्क करून माहिती दिली मोबाईल हरवला गेला
म्हणून
गुन्हयाचे तपासात पोलीस अधीक्षक औरंगाबाद मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनावरून सपोनि देविदास वाघमोडे फर्दापूर पोलीस स्टेशन यांनी मोबाईलचा शोधाशोध करून दोन मोबाईल परत करण्यात आले. अशे औरंगाबाद जिल्ह्यातील पोलीस स्टेशनने तोटल नागरिकांचे २७ मोबाईल हँण्डसेट ज्याची किमंत आज रोजी अंदाजे ३,९६,५१६ रुपये किंमतीचे मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले. त्यांचा हरवलेला मोबाईल परत मिळालेला पाहून त्यांनी आनंद व्यक्त करून डोळ्यात पाणी आले.
अशा बऱ्याच गुन्हातील घटनेचे शोध फर्दापूर पोलीस स्टेशनने लावलेले आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जाऊन सपोनि देविदास वाघमोडे व तक्रारदार यानां सोबत घेऊन पोलीस अधीक्षक मनीष कालवनिया साहेब औरंगाबाद कार्यालयात दोन मोबाईल पोलीस अधीक्षक मनीष कालवनिया साहेब यांच्या हस्ते परत करण्यात आले.मोबाईल तक्रारदाराने सपोनि देविदास वाघमोडे व फर्दापूर पोलिस स्टेशनचे आभार मानले.







