गांज्या सापडल्यावर प्रशासन तात्काळ धावते, मग नुकसानीच्या पंचनाम्याला उशीर का?
सोशल मीडियावर टीकेचा घणाघात
त-हाडी
कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. .सध्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक पाण्यात बुडाले. सगळीकडे हाहाकार सुरू असताना प्रशासन सुस्त आहे. बांधावर कोणी
तात्काळ पोहचत नाही. हाच धागा पकडून सोशल मीडियातुन प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्यावर टीकेची झोड उठली जात आहे. फेसबुक, व्हाट्सएप, स्टेट्स, ट्रिटर वरुन टीका सुरू आहे. शेतात गांज्या सापडल्यावर प्रशासन तात्काळ धाव घेते, मग नुकसानीच्या पंचनाम्याला उशीर का ? अशा पोस्ट टाकून निषेध नोंदवला जात आहे. शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोरं हा आक्रोश प्रशासनाकडे करत आहेत. कुठेतरी शेतात गांज्या आढळून आला अशी माहिती मिळताच शासन खडबडून जागे होऊन शेतात जाऊन चौकशी, पंचनामे करते अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान दुष्काळ आशा वेळी कोणी धावून येत नाही अशी खदखद शेतकरी व्यक्त करत आहेत. पिकांचे पंचनामे करून पीकविमा आणि नुकसानभरपाई तात्काळ देण्यात यावी शेतकऱ्यांप्रती दुजाभाव करू नये, सतर्क राहून पाहणी करायला हवी भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे







