त-हाडी येथे रेशन दुकानात शिधा किटचे वाटप
त-हाडी
शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथे सर्व सामान्य आणि गोरगरिबांची दिवाळी व भाऊबीज स्वस्तात साजरी व्हावी म्हणून शिंदे-सरकारने शिरपुर तालुक्यातील गरीब नागरिकांना प्रथमच साखर, चणाडाळ, रव,तेल अशा चार वस्तू आहे. आनंदाचा शिधा किट रेशन दुकानात व शिरपूर शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणच्या रेशन दुकानात तहसीलदार. आबा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुक्यात सुरुवात झाली आहे
अशा प्रमाणेच त-हाडी येथे सुरुवात झाली आहे.दिवाळी गेली खाली पण तुळशी विवाह च्या मुहूर्तावर आज दि.६/११/२२ रविवार रोजी दुपारी एक वाजता ग्रामस्थांच्या यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप करण्यात सुरुवात झाली. शिधापत्रिकाधारकांना आनंद शिधा किटचे वाटप करण्यात आले. , त-हाडीचे ग्रामस्थची उपस्थिती होती.
उशिरा का होईना दिवाळी जरी गोड नाही तरी तुळशी विवाह हि गोड झाली आहे अशे गोरगरीब जनतेतून सूर निघत होता आणि आमची तुळशी विवाह हि गोड झाले आहे. त-हाडी येथील ग्रामस्थांनी मानले राज्य शासनानचे यांचे मानले आभार अशी माहिती रेशन दुकानचे मालक शरद सोनवणे दुकान नंबर ६० यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.







