वलठाण ता.चाळीसगाव येथे गुढीपाडवा निमित्त आयोजित केलेल्या भव्य किटकॅट (विकी) बॉल क्रिकेट स्पर्धेच उद्घाटन समारंभ मा.राहुल भाऊ पाटील (शिवसेना तालुकाप्रमुख) यांच्या हस्ते पार पडला.
*शिवसेना नेते मा.उमेश (पप्पुदादा) गुंजाळ यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. अशा क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून तरूण मुले एकत्रित येऊन एकमेकांशी संवाद साधताना आपापसातील सौदार्य वृद्धीस लागते. खरंतर या क्रिकेट स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळत असते व ते भविष्यात राज्य पातळीवर खेळताना दिसतील, असे मत राहुल पाटील यांनी व्यक्त केल व आयोजकांचे आभार मानले.*
*या उद्घाटना प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख मा.राहुल पाटील, सरपंच सिताराम राठोड, उपसरपंच संजीव राठोड, सदस्य राहुल राठोड,सागर चौधरी,शुभम राठोड,संदीप राठोड, आरपीआय तालुकाध्यक्ष कैलास सुर्यवंशी,डाॅ.कैलास राठोड,विजय राठोड, गंगाराम चव्हाण, दिलीप राठोड, सचिन राठोड, अमृत राठोड व वलठाण क्रिकेट क्लब चे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते...*