गारपीट वादळी पावसाने नुकसान भरपाई मागणी
तलाठी देतोय उडवा उडवी उत्तर
दोन दिवस झाले तरी अधिकारी एसी रुममध्ये, अजून एकही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोचला नाही
गारपीट वादळी पावसाने नुकसान भरपाई मागणी
तलाठी देतोय उडवा उडवी उत्तर
त-हाडी – शुक्रवारी दुपारी जोरदार वाऱ्यासह पाऊस व गारपीट सुसाट वारा, विजांचा कडकडाटात जोरात पाऊस सुरु झाल्याने शेत पिकांचे व घरांचे प्रचंड नुकसान झाले. त्यातून लाईन चा पत्ता गुल व अनेक रस्त्यांवर झाडे पडल्याने संपर्क सुध्दा तुटून त्रेधा उडाली.
त-हाडीज्ञव परिसरातील वरुळ भटाणे अभानपुर विखरण जवखेडा भामपुर ममाणे जळोद फत्तेपूर (फाॅ) येथे दुपारी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली. त्यात घरावरील टीनपत्रे उडाली तर शेतातील मका बाजरी , , कांदा, आंबे आदी पीके जमीनदोस्त झाली. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यात जोरदार पाऊस सुरु झाला. जवळपास तासभर झालेल्या या अवकाळीने मोठमोठी झाडे रस्त्यावर येऊन पडली तर अनेक शेतकऱ्यांची वाचलेली पीके नष्ट झाले. अनेक घरांवरील पत्रे उडाली तर काहींच्या भिती सुध्दा पडल्या. विद्युत तारा तुटल्याने दिवसभर व रात्रभरासह आजही लाईन गुलच झालेली असल्यामुळे अनेक समस्या ओढवल्या. घरात गारा व पाणीच पाणी होते. आज सकाळी शेतकरी व नागरिक आपल्या नुकसानीची पाहणी करीत असताना अनेकांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत तर काहीतरी सुरळीत करण्याचा जो तो प्रयत्न करीत आहेत. त-हाडी येथील तलाठी देतोय उडवा उडवी उत्तर , मिडिग मध्ये आहे तब्येत बरी नाही असे अनेक कारण सांगत त्यामुळे झालेल्या नुकसानीचा त्वरीत पंचनामा करून भरीव मदत लवकरात लवकर करावी अशी आर्त हाक नुकसानग्रस्त व्यक्त करीत आहेत.