लोकसभेपूवी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांबाबत उत्कंठा
त-हाडी –
लोकसभेच्या निवडणुकांसाठी येत्या काही दिवसांत आचारंसहित लागु होईल तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीच्या मुदत येत्या काही महिन्यात संपणार आहेत त्यामुळे ग्रामीण भागात लोकसभेपूवी ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागतील कि नाही याची सर्वांना उत्सुकता आहे या निवडणुकीकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास विकासकामावर परिणाम होऊ शकतो तालुक्यात १९ ग्रामपंचायत आहेत येत्या काही महिन्यात १९ ग्रामपंचायतीची मुदत काही महिन्यात संपणार आहे काही दिवसांपूर्वी या ग्रामपंचायतीच्या सरपंचाची आरक्षण सोडत जाहीर झाली त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य,व निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली आहे काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत सदस्यपदीसाठी असलेले आरक्षण कालपर्यंत संपलं आहे मतदार यादी सुध्दा तयार झाल्या आहेत प्रसिद्ध झाल्या आहेत ग्रामीण भागातील सह राजकीय पक्षातील नेत्यांचे या निवडणुकीच्या बिगुलाकडे लक्ष लागले आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यावर लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडतो. राजकीय वातावरण तापले असते एकाच पक्षातील दोन गट परस्परविरोधात काम करताना आपल्याला दिसतात यामुळे या कार्यकर्त्यांना सांभाळूने राजकीय पक्षांना सुध्दा अडचणींचे जाते ग्रामपंचायत आपल्याच गटाच्या ताब्यात पाहिजे अशी प्रत्येक राजकीय नेत्यांची व कार्यकर्तेची इच्छा असते लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने आपल्या पक्षाची बाजू मजबूत असण्याकरिता आमदार व पक्षाचे पदाधिकारी यांची मोठी रस्सीखेच या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहे
प्रतिक्रिया
अद्याप पर्यात कोणताही आदेश नाही
सदस्यांची आरक्षणाची सोडत आणि त्याबाबतती सर्व कार्यक्रम संपले आहे त्याप्रमाणे मतदार यादी काम ही पुर्ण झाले तयार झाल्या आहेत व प्रसिद्ध झाले निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व झाले आहे निवडणूका केव्हा होईल हे आता सांगता येत नाही तशा प्रकारच्या कोणत्याही सुचना आम्हाला आद्याप प्राप्त झाले नाही
अधिकार पेंढारकर
निवडणूक निर्णय अधिकारी शिरपूर
चौकट
ग्रामपंचायत निवडणुकीच्या बिगुलाकडे सर्वांचे लक्ष आहे लोकसभेपूवी निवडणूका जाहीर होणार कि नाही
ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या काही दिवसांत लागल्या नाही तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर ग्रामपंचायतीच्या धुराळा उडालेला आपल्याला दिसेल राजकीय धुरिणांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका लोकसभेनंतर लागु शकतात अशी शक्यता व्यक्त केली आहे
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत
१)त-हाडी
२)नवे भामपुर
३)भरवाडे
४) जयतपुर
५)आढे,
६)पिप्री
७)अहिल्यापुर
८)सावेर,गोंदी
९)पिळोदा
१०)जापोरा
११)रुंदावली
१२)वनावल
१३)भरवाडे
१४)टेंबे बु!
१५)चांदपुरी
१६)वाडी,बु
१७वासडी
१८) सुभाष नगर
१९) अजदे खु