त-हाडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेसमोरील मुख्य रस्त्यावर कचऱ्यामुळे दुर्गंधी; शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका : ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष
त-हाडी प्रतिनिधी : शिरपूर तालुक्यातील त-हाडी ग्रामपंचायतच्या निष्काळजीमुळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे समोर कचऱ्याचे मोठे ढिग निर्माण झाले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरीक व विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे .
त-हाडी येथील रहिवाशी घरातून निघणारा ओला आणि सुखा कचरा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळे समोरील मुख्य रस्त्यावर दररोज टाकत आहेत. त्यामुळे कचऱ्याचे मोठे ढिग निर्माण झाले आहेत.
आणि सतत पाणीमुळे दुर्गंधी पसरत आहेत
.
या रस्त्यावरील त-हाडी गावात जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीच्या सामना करावा लागत असून समोर शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना दिवसभर याच्या त्रास सहन करावा लागत आहेत.
दोन महिन्यापासून सतत ढगाळ वातावरण आणि सतत रिमझिम पाऊसामुळे लोकांना विविध प्रकारचे आजार होत आहेत. परंतू येथील ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत. ही दुर्गंधी दिवसंदिवस वाढत चालली असून यामुळे अनेकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहेत.