गळवेवाडीतील सिद्धनाथ विद्यालयाच्या मुलींचे कब्बडीमध्ये घवघवीत यश
आटपाडी प्रतिनिधी
गळवेवाडी ता. आटपाडी येथील सतरा वर्षाखालील मुलींच्या संघाने गौरवित यश मिळवले आहे. नुकत्याच माध्यमिक विभाग अंतर्गत घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत कबड्डी या खेळात सिद्धनाथ माध्यमिक विद्यालय गळवेवाडी येथील 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने घवघवीत यश मिळविले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील माध्यमिक विभागांतर्गत श्रीमंत बाबासाहेब देशमुख विद्यालय आटपाडी येथे घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत कबड्डी या खेळ प्रकारात 17 वर्षाखालील मुलींच्या सामन्यात सहभाग नोंदवून सिद्धनाथ माध्यमिक विद्यालय गळवेवाडी या शाळेतील मुलींच्या संघाने सामन्यात नेत्रदिपक खेळ केला.
तसेच फायनल चा सामना सुद्धा उत्कृष्ट खेळ करून जिंकला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला तसेच बुद्धिबळ स्पर्धेत शुभम पांडुरंग गोडसे याची निवड झाली आहे.
मुख्याध्यपिका मंगल गळवे यांची प्रेरणा मिळाली. तसेच शिंदे एस जी ,सरगर आर एम ,राऊत ए आर ,वाघमारे एस बी ,गळवे एम एस तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचे सहकार्य मिळाले असून या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
फोटो.. विजयानंतर जल्लोष साजरा करताना विद्यार्थिनी व शिक्षक