ज्या शेतकऱ्यांचे यादीत नाव नाही आले अशा शेतकऱ्यांना आता तलाठी पेऱ्याच्या आधारावर शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य
तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांच्या मागणीची शासनाने घेतली दखल
त-हाडी/प्रतिनिधी
त-हाडी : राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी नोदणी केलेल्या वैयक्तिक शेतकऱ्यांचे अर्ज संकलन कृषी विभागामार्फत करण्यात आले. परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी करून आणि तशी नोद 7/12 वर असून देखील काही शेतकऱ्यांची नावे शासनाकडून प्रसिद्ध केलेल्या यादीत नव्हते. अशा पात्र शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहू नये म्हणून शिरपूर तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री संजय पवार यांनी सदर बाब पुराव्यानिशी कृषी विभागाच्या राज्य पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच परिपाक म्हणून राज्य शासनाने खरिप 2023 या हंगामात कापुस व सोयाबीन पेरणी केलेल्या आणि त्या पिकाची नोंद सातबारावर आहे. अशा शेतकऱ्याचे अर्ज तलाठी आणि कृषी सहाय्यक यांच्या मार्फत संकलन करण्याबाबत राज्य पातळीवरुन सूचना देण्यात आल्या आहेत.
तरी शिरपूर तालुक्यातील खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस व सोयाबीन पिकाची पेरणी करून त्याची नोंद सातबारावर असेल आणि प्रसिद्ध केलेली यादीत नाव समाविष्ट नसेल अशा शेतकरी बांधवांनी अनुदान मिळण्याकरिताचा वैयक्तिक बाबीचा विहित नमुन्यातील अर्ज, 7 /12 ची प्रत ज्यावर खरीप 2023 या वर्षात कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद असल्याबाबतचा पुरावा, आणि स्वयंसाक्षांकित आधार कार्डची झेरॉक्स प्रत, आपल्या गावाच्या संबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी मित्र यांच्याकडे जमा करावी. राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२० हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रू. १०००/- तर ०.२ हे. ते २.०० पवेतोच्या क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५०००/- (२ हे. च्या मर्यादेत) अर्थसहाय्य देय करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.
यामध्ये ई पिक पोर्टलद्वारे खरिप २०२३ हंगामात कापुस व सोयाबिन लागवडीची नोंद केली आहे असेच शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
फोटो – संजय पवार, तालुका कृषी अधिकारी शिरपूर