लोहार समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे
गाडी लोहार समाज उन्नती मंडळाने मुख्यमंत्री यांना निवेदन
द्वारा अध्यक्ष अँड. युवराज मुरार जाधव यांनी लोहार समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे यासाठी द्वारा, मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) यांना निवेदन सादर करून मांग केलेली आहे. विविध जातींना ज्या प्रमाणे आर्थिक विकास महामंडळ स्थापण केले आहे
त्याच प्रमाणे लोहार समाज सुद्धा भटक्या जातीच्या सूचित असून त्यांचा सर्वांगीण विकास आज ही रखडला आहे त्यासाठी, समस्त महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विद्यार्थी व उद्योग व्यवसाय व परिवाराचा सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे
यासाठी लोहार समाजाचे अध्यक्ष अँड. युवराज मुरार जाधव, सचिव श्री राजेंद्र निंबालाल जाधव, खजिनदार श्री सुकलाल मयाराम कु-हेकर, संचालक श्री दिपचंद धर्मदास राठोड, श्री प्रल्हाद दत्तात्रय कु-हेकर, श्री अनिल मक्कन गोराणे, श्री दिपक लकडू लोहार, श्री गणेश पुरुषोत्तम गोराणे, श्री निलेश रतीलाल पवार, श्री दिपक शंकर लोहार, श्री महेश शांताराम गोहिल, श्री दगडू विक्रम परमार, श्री जीवनदास ब्रिजलाल पवार, श्री किशोर लोटन लोहार या संपूर्ण लोहार समाज प्रतिनिधी मंडळ यांनी पूर्ण ताकदी निशी वाटचाल केलेली आहे. व महाराष्ट्र शासना कडून मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा त्यांच्या मागणीवर योग्य विचार करू असा प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. समस्त लोहार समाजाला आशा आहे की नक्कीच शासन त्यांच्या मागणीवर शंभर टक्के विचार करणार.