त-हाडी ग्रामस्थांच्या हाती पुन्हा लोटा! हगणदारीमुक्ती नावालाच; बक्षिसांची केवळ खैरात…..गुड मॉर्निंग पथक सक्रिय करण्याची गरज,
त-हाडी : राज्य शासनाने ग्राम स्वच्छतेसाठी व विशेषकरून महिलांची होणारी कुचंबणा लक्षात घेऊन स्वच्छतागृह बांधकामासाठी अनुदान देण्यात आले. ग्राम स्वच्छतेसाठी स्थानिक पातळीवर गुड मॉर्निंग पथकाचीही स्थापना केली होती.
जिल्हा तालुकास्तरावर शासकीय पथक स्थापन करून गावातील स्वच्छतेची पाहणी करून १०० टक्के स्वच्छता केली. त्या गावच्या ग्रामपंचायतीला बक्षिसांची खैरातही वाटण्यात आली. परंतु, ही योजना वाऱ्याची झुळूक आल्यासारखी वाऱ्यावरच उडून गेल्याचा भास होत असून, त-हाडी (ता.शिरपुर) येथील नागरिकांनी पुन्हा लोटा हाती घेतल्याने शासन व प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गुड मॉर्निंग पथकाला सक्रिय करावे, अशी मागणी होत आहे. ग्रामीण खेडे दुर्गंधीमुक्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सुरू केल्या. या योजनेची प्रशासनाने अंमलबजावणीसुद्धा केली होती. त्यात लोकप्रतिनिधींनीही सहभाग घेतला होता. गावचे निरीक्षण करून स्वच्छतेत नंबर काढले. त्या गावच्या सरपंचांना पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार करून बक्षीस दिले होते. मात्र, अलीकडे शासनाच्या व प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे त-हाडी येथील ग्रामस्थ पुन्हा उघड्यावरच बसत असल्याने दुर्गंधीमुक्त गावात पुन्हा दुर्गंधी पसरली आहे. हे चित्र त-हाडी ते अभानपुर, व शिरपूर ते शाहदा या मुख्य रस्त्यावर दिसून येत आहे. याबाबत शिरपूर चे गटविकास अधिकारी संजय सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता मी मिटिंगमध्ये आहे मला सांगता येणार नाही
असल्याचे प्रतिनिधी’शी बोलतांना सांगितले.
— प्रतिक्रिया—-
गावातील लोकसंख्या दहा हजारांच्या आसपास आहे, त-हाडी मध्ये एक शौचालय ममाणे मध्ये एक शौचालय बांधली, आहे त-हाडीचे ग्रामस्थ सकाळी पाच ते सहा दरम्यान मुख्य रस्त्यावर शौचास बसतात, गुड मॉर्निंग पथक स्थापन करण्यात आले आहेत पण कार्यरत नाही ही त-हाडीचे ग्रामविकास अधिकारी देविदास धांडे .यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले
दुर्गंधीमुक्त गाव फक्त कागदावरच;
या गावांत शासकीय अनुदानाच्या माध्यमातून बांधलेले स्वच्छतागृह फक्त अनुदानापुरतेच असल्याचे दिसून आले.
दुर्गंधीमुक्त गाव झाल्याचे कागदावर दिसून येते. परंतु, प्रत्यक्षात वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा ‘गुड मॉर्निंग करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
पुरस्कार घेतलेल्या गावातील ग्रामस्थ हातात लोटा घेऊन जातात उघड्यावर;
स्थानिक अधिकारी-कर्मचाऱ्यांचे याकडे लक्ष नसल्याने दुर्गंधीमुक्तीचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस टमरेल घेऊन उघड्यावरच बसणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवड्यांतर्गत तालुक्यात हे अभियान दिमाखात झाले होते. मात्र काहींनी फक्त अनुदान घेण्यासाठी थातुरमातुर स्वच्छतागृहाची बांधकामे केली आहेत.
त-हाडी : अभानपुर कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच त-हाडी चे ग्रामस्थ शौचालय बसत असल्याचे दिसून आले. शनिवार सकाळी ६:२० वाजता टमरेल घेऊन जातांना घेतलेले छायाचित्र..