आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुका आटपाडी येथे महानोकरी मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती महेश कुमार पाटील यांनी दिली.ग्रामीण भागातील शहरातील गरजू गरजवंत विद्यार्थी तरुण आणि ज्यांना रोजगार पाहिजे काम पाहिजे अशा प्रत्येकासाठी आटपाडीमध्ये येत्या 10 तारखेला महा नोकरी मेळावा आयोजित केला आहे.
हा मेळावा आयोजित करण्याचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोकांना रोजगार आणि नोकरी मिळावी तसेच ग्रामीण भागातील तरुणांना मुलाखतीला गेल्यावर मुलाखती कशा द्यायच्या मुलाखती देत असताना कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते ,मुलाखती देत असताना कोणत्या कंपन्या निवडल्या पाहिजेत ,अशा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
त्याचबरोबर जे तरुण , विद्यार्थी जे गरजू मुलं मुली विवाहित अविवाहित मुलं-मुली अशा सर्वांना या प्रसंगी मुलाखती देऊन नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे.
ग्रामीण भागामध्ये किंवा वेगवेगळ्या भागांमध्ये जिथे तरुणांना नोकरी विषयी माहिती कमी असते रोजगार आणि काम कुठे शोधायचे हा प्रश्न असतो त्या सर्व तरुणांना विद्यार्थ्यांना मुलांना मुलींना या मेळाव्याच्या माध्यमातून एक चांगला प्लॅटफॉर्म मिळणार आहे. कारण दाखवण्यापेक्षा मार्ग शोधले पाहिजेत आणि मार्ग शोधत असताना चांगले मार्गदर्शन मिळाले पाहिजे यासाठी हा मेळा आयोजित केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते महेश कुमार पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच आशीर्वाद सॉफ्टवेअर ट्रेनिंग सेंटर यांच्या माध्यमातून हा महानोकरी मेळावा आयोजित केला गेला आहे.
तरी प्रत्येक गरजू गरजवंत व्यक्तीने या मेळाव्यास यावे आणि स्वतःला सिद्ध करून मुलाखती देऊन जास्तीत जास्त लोकांनी या संधीचा फायदा घ्यावा असे महेशकुमार पाटील यांनी बोलताना सांगितले.