मानवतेचे माहेरघर – दोन मजली इमारत स्वप्न पूर्ण होणार!
डॉकटर रविन्द्र जाधव यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मित्रांनो, गाव – बोरशेती, तालुका – शहापुर, येथे नाशिक शहापूर हायवे ला लागून दोन मजली इमारत ( रेडिमेड ) आहे. आम्ही ही इमारत विकत घेत आहोत. या ठिकाणी आम्ही अनाथ आणि निराधार वृद्ध, मुले, महिला यांच्यासाठी मोठी धर्मशाळा किंवा माणुसकीचा आश्रम उभा करीत आहोत . जवळपास 200 निराधारांची व्यवस्था होईल.
मित्रांनो, अशा या प्रोजेक्टला तुमच्या मदतीची गरज आहे. आता आपल्याला त्यांना पन्नास लाख रुपये जमा करून द्यायचे आहेत. आपल्यासारख्या श्रीमंत दानशूर मित्रानी जर दोन वर्षासाठी बिना व्याजाने जर एक लाख , पाच लाख, दहा लाख रुपयांची मदत केली तर खूप मोठ सामाजिक कार्य उभे राहिल. खूप मोठे पुण्याचे कार्य तुमच्या आणि माझ्या हातून होईल.
आम्ही आपल्याला एग्रीमेंट करून भरोसा देऊ . मी स्वतः माझ्या वैयक्तिक स्तरावरती तुम्हाला एग्रीमेंट बनवून देईन की मी दोन वर्षात आपली रक्कम परत करेन. मात्र ही रक्कम बिना व्याजाची असावी अशी नम्र विनंती आहे. जर ही रक्कम परत केली नाही तर बिल्डिंगमध्ये असलेले रूम तुमच्या नावावर करून देण्यात येतील.
तरी श्रीमंत दानशूर इच्छुक मित्रांनी तात्काळ मदत करावी अशी अपेक्षा आहे. त्या बिल्डिंगमध्ये आपल्याला हॉस्पिटल प्लस वृद्धाश्रम प्लस निराधार मुलांचे वस्तीगृह, महिलांचे आश्रम, तसेच गोर गरीब विद्यार्थी मित्रासाठी मोफत UPSC / MPSC रहिवाशी प्रशिक्षण केंद्र सुरू करता येईल. हे खूप मोठे पुण्याचे काम तुमच्या आणि माझ्या हातून होणार आहे.
गेली अनेक वर्षे तुम्ही मला या समाजकार्यामध्ये पाहता आणि म्हणूनच तुमची मदतीची गरज आहे. बँकांचे लोन घेणं सोपं आहे परंतु 14% ते 18% व्याजदर पेड करणे कठीण असतं.
म्हणून आपल्या सगळ्यांच्या मदतीने ही रक्कम मी सहज उभी करू शकतो अशी खात्री आहे .वर दिलेला इमारतीचा फोटो पाहून घ्यावा अगदी रोड टच आहे. हायवेला लागून आहे.
इतर मदत करू इच्छिणाऱ्या मित्रांनी पुढे येऊन मला सहकार्य करावे. मार्गदर्शन करावे. ज्यांना जे सहकार्य देता येईल ते द्यावे.
हे एक मानवतेचे माहेर घर, मंदिर ठरणार आहे. यात तीळमात्र शंका नाही. धन्यवाद मित्रांनो!
संपर्क करा. पत्ता* : न्यू रचना पार्क सोसायटी शॉपिंग सेंटर Dmct Old Age Hospital & Old Age Home आहे , चक्किनाका , कल्याण पूर्व , पिन 421306, जिल्हा : ठाणे , महाराष्ट्र
कॉन्टॅक्ट : डॉ. रवींद्र जाधव, मो. 7400439760 / 9833155731 , 7977211807 ( कॉल उचलला नाहीतर व्हाट्सऍप वर मॅसेज करा. वेळ : सकाळी 10 ते 5 या वेळातच )