डॉ.बालाजी किणीकर विजयी चौकार मारणार की
त्रिफळाचित होणार ?
डॉ.बालाजी किणीकर विजयी चौकार मारणार की
त्रिफळाचित होणार ?
डॉ.बालाजी किणीकर विजयी चौकार मारणार की
त्रिफळाचित होणार ?
अंबरनाथ विधान सभेत कोण होईल अंबरनाथचा नाथ ? कोण होईल अनाथ ? कोणाचा होईल घात ??
डॉ.बालाजी किणीकर विजयी चौकार मारणार की
त्रिफळाचित होणार ?
दिलीप मालवणकर यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
अंबरनाथ विधान सभा निवडणुकीचा मी १९७८ पासूनचा साक्षीदार आहे.१९७८ ते २०१९ दरम्यान एकुण १० निवडणुका झाल्या. या १० पैकी गेल्या ३ निवडणुका वगळता ७ निवडणूकीत बाहेरचे ( उपरे ) उमेदवार लादले गेले व त्यांनी आमदार म्हणून ३१ वर्षे सत्ता गाजवली. जगन्नाथ पाटील १९७८; नकुल पाटील १९८० व १९८५ ; साबीरभाई शेख १९९० ते २००४ ; किसन कथोरे २००४ ते २००९ असे ३१ वर्षे आमदार राहिले. यातील नकुल पाटील, जगन्नाथ पाटील व साबीरभाई शेख यांना मंत्रीमंडळातही स्थान मिळाले. डॉ. बालाजी किणीकर हे असे एकमेव आमदार आहेत जे स्थानिक असून ते १५ वर्षे आमदार आहेत. अर्थात ही संधी त्यांना एकसंघ शिवसेनेने दिली होती, हे नाकारता येणार नाही. दुस-या बाजूला स्थानिक नेते शाम आनंदा गायकवाड हे प्रभावी व अभ्यासू नेतृत्व असूनही त्यांच्यावर १९९०, १९९५,२००९ व २०१४ च्या निवडणूकीत अंबरनाथकरांनी पराभवाची नामुष्की आणली.त्यांना कमाल २० टक्के ते किमान ३ टक्के इतकी मतं २० हजार ते ४ हजार इतकी मतं मिळाली. त्यांनी पराभवाचा चौकार मारला. दुसरे स्थानिक पत्रकार कमलाकर सुर्यवंशी यांनाही ११ टक्क्यांहून अधिक मतं मिळाली नाहीत २०१९ ला तर त्यांना अवघी ८७० मतं मिळाली होती. अनुक्रमे २००९, २०१४ व २०१९ च्या निवडणूकीत त्यांनी दारूण पराभवाची हॅटट्रीक साधली.
अंबरनाथ विधान सभा मतदार संघाची २००८ मधे पुनर्रचना झाली व हा मतदार संघ अनुसुचित जाती (SC ) साठी राखीव झाला. त्यामुळे अरविंद वाळेकर, सुनिल चौधरी सारख्या इच्छूकांच्या आमदारकीच्या आकांक्षांना कायमचा ब्रेक लागला. या मतदार संघात अंबरनाथ ग्रामिण महसूल मंडळ,अंबरनाथ नगर पालिका तसेच उल्हासनगर महापालिकेतील प्रभाग क्र.१४ ते २२ व ४४ ते ५१ असे १७ प्रभाग येतात. या मतदार संघाची विभागणी ३३९ बुथ मधे झाली असून अंदाजे ३ लाख ४० हजार मतदार आहेत. येथे सरासरी ४५ ते ५० टक्के मतदान होते.
या पार्श्वभूमीवर २०२४ ची निवडणुक जवळ आली आहे.आपल्या भाषेत घोडा मैदान जवळ आहे. शिवसेनेतील फुटीनंतर जे १६ आमदार प्रथम शिंदे गटासोबत गेले त्यात डॉ.बालाजी किणीकर होते.आता त्यांना गद्दार म्हणावे की नाही ? हा प्रश्न दीपेश म्हात्रेच्या पक्ष प्रवेशानंतर भेडसावत आहे. जे लोक धाक दडपशहा वा इडीच्या भीतीने शिंदे बरोबर गेले ते गद्दार नाहीत असा युक्तिवाद केला जात आहे.
डॉ.बालाजी किणीकर यांना आत्ता गद्दार म्हणावे की खुद्दार ? कारण ते पक्षांतर्गत वैमनस्यामुळे व जीवाला असलेला धोका तसेच इडीच्या नोटीसीमुळे गेले असे ते स्वत: म्हणतात. उद्या त्यांना उपरती झाली व त्यांना खुद्दार ठरून उमेदवारी दिली गेली तर शिवसैनिकांची गोची होणार की नाही ? मध्यंतरी ते पक्ष प्रवेशासाठी प्रयत्नशील होते, म्हणून ही शंका घेतली जात आहे.
डॉ.बालाजी किणीकर यांना माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकरांचा प्रखर विरोध आहे.त्यात आता रमेश महादेव चव्हाण याचाही विरोध जाहिर झाला आहे. अशा परिस्थितीत जर किणीकर यांनी घुमजाव केले तर ? डॉ. बालाजी किणीकर यांना पर्याय म्हणून माजी पत्रकार व निर्भय बनोचा माजी धडाडीचा कार्यकर्ता जो सद्या शिंदे गटाचा प्रदेश प्रवक्ता आहे अशा किरण सोनवणेचा विचार होऊ शकतो का ? याचीही चाचपणी सुरू आहे.
दुसरी कडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे डॉ.जानु मानकर हा सक्षम पर्याय आहे. एका डॉक्टर विरोधात दुसरा डॉक्टर ! असा विचार उच्चस्तरावर मान्यही झाला होता. परंतू स्थानिक व दोन वरिष्ठ नेत्यांनी त्यात खो घातला व भाजपचा दलबदलू माजी नगरसेवक राजेश वानखडे याचा पक्ष प्रवेश करवून घेऊन भावी आमदार म्हणून अभिषेकही करवून घेतला. शिवसेनेकडे सक्षम उमेदवार असताना भाजपाची ही “उष्टी पत्रावळ” कशाला ? असा प्रश्न शिवसैनिक विचारत आहेत. लोकसभा निवडणुकीत याच राजेश वानखेडेने निष्क्रिय राहणे, खासदार त्यांच्या व्यासपिठावर येणे, शिंदे गटाशी असलेली जवळीक, अरूण आशान,सुरेश जाधव व रमेश चव्हाण या शिंदे समर्थकांची महापालिकेतील अर्थपूर्ण सलोख्याचे संबंध या बाबी शिवसैनिकांना खटकत आहेत. तसे दबक्या स्वरात बोलले जात आहे. त्यामुळे मानकर व वानखेडेंना वगळून दुसरा उमेदवार ( तो ही बाहेरचा/ची ) लादला जाऊ शकतो. अशा वेळी राजेश वानखेडेने अपक्ष राहून शिवसेनेची मतं खाल्यास डॉ. बालाजी किणीकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो.
संपर्क नेते गुरूनाथ खोत यांच्या अकार्यक्षमतेमुळे अंबरनाथ मतदार संघातील मुळ शिवसेनेतील शेकडो शिवसैनिक व पदाधिका-यांनी केलेले पक्षांतर व ते रोखण्यात त्यांना आलेले अपयश तसेच याच बरोबर यापुर्वीच नमुद केल्या प्रमाणे वाळेकर व रमेश चव्हाण हे वानखडेला मदत करू शकतात व किणीकरांचे टेन्शन वाढवू शकतात. जर चुकून माकून वानखडे निवडून आले तर शिंदे गट व भाजपा तर रेड कार्पेट अंथरून त्यांचे स्वागतच करतील.
या मतदा संघाचा पुर्वेतिहास पाहिला तर बहुतेक वेळा विजयी उमेदवाराला मिळालेले मताधिक्य हे अपक्ष व बंडखोरांनी केलेल्या मतविभाजनामुळे लाभले आहे.१९७८ ला जगन्नाथ पाटलांना ९६१७ मताधिक्य होते १९८० ला नकुल पाटलांना अवघे ३२०७ चे मताधिक्य होते. २००४ ला किसन कथोरेंना ८०९३ चे मताधिक्य होते, २००९ साली डॉ. किणीकर हे १९ हजार मताधिक्याने निवडून आले होते. त्यावेळी महेश तपासे यांना ३० हजार ४९१ मतं मिळाली होती तर श्याम गायकवाड यांना १७ हजार ७ मतं व कमलाकर सूर्यवंशी यांना ९ हजार ९ मतं मिळाली होती. डॉ. किणीकर १९ मताधिक्याने जिंकले होते परंतू विरोधकांची २७ हजार मतं विभागली गेली नसती तर डॉ. बालाजी किणीकर याच निवडणूकीत ८ हजार मतांनी पराभूत होऊ शकले असते. २०१४ ला डॉ.बालाजी किणीकर यांना अवघे २०४१ चे मताधिक्य होते. २०१९ ला डॉ बालाजी किणीकर यांना २९ हजार २९४ चे जरी मताधिक्य होते तरी कॉन्ग्रेसचे रोहित साळवे ३० हजार, वंचितचे धनंजय सुर्वे १६ हजार, मनसेचे सुमेध भवार १३ हजार असे मत विभाजन झाल्याने डॉ. किणीकर विजयी होऊ शकले हा इतिहास दुर्लक्षून चालणार नाही. मात्र साबीरभाई शेख यांनी १९९० ला ४१ हजार २०१ चे व १९९५ ला ५४ हजार ४८६ चे घेतलेले मताधिक्य निर्विवाद होते. हे विक्रमी मताधिक्य न भूतो न भविष्यती ठरावे, असे होते. भविष्यात हा विक्रम कोणी मोडू शकणार नाही.
या मतदार संघात अजून एक Twist पहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदार संघाच्या जागा वाटपाच्या वाटाघाटीत हा मतदार संघ कॉन्ग्रेसला सोडला जाऊ शकतो. महाड पोलादपुर मधुन माणिकराव जगताप यांच्या कन्येस स्नेहल जगताप यांना शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी दिल्यास त्याबदल्यात अंबरनाथ मतदार संघ ठाकरे गट कॉन्ग्रेसला सोडण्याची शक्यता या मतदार संघातून २०१९ ची निवडणूक लढवलले रोहित साळवे व्यक्त करीत आहेत. त्या निवडणूकीत रोहित साळवे यांना ३१ हजार मतं मिळाली होती. यात शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादीची मतं मिळवल्यास कॉंग्रेसला डॉ बालाजी किणीकर चारी मुंड्या चित्त करणे शक्य होईल. तसे झाल्यास अंबरनाथ मतदार संघातून इच्छूक असलेले भावी आमदार अनाथ होतील. मग अंबरनाथचा नाथ डॉ. किणीकर की रोहित साळवे याचा निवाडा साडेतीन लाख मतदारच करतील. एकंदरीत ही निवडणूक चुरशीची होईल किमान तिरंगी वा चौरंगी लढत होऊनअंबरनाथचा नाथ कोण ? हे ठरेल.
घोडा मैदान जवळच आहे. पाहूया नियतीच्या मनात काय आहे, ते !