नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या नऊ कर्तृत्ववान आशा स्वयं सेविकांचा जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने सत्कार…!
बदलापूर (गुरुनाथ तिरपणकर)
आशा स्वंय सविका या मानधनावर काम करत असतात,शैक्षणिक आरोग्य विषयक,स्वच्छता अभिमान अशा शासनाच्या अनेक उपक्रमांची कामे व जनजागृती आशा स्वयं सेविकांना करावी लागते.तुटपुंज्या मानधनावर मानधनावर काम करत असतानाही त्या आपले कर्तव्य चोख बजावत असतात.त्यांचा मान सन्मान व्हावा याच उद्देशाने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून जनजागृती सेवा संस्थेच्यावतीने कर्तृत्ववान नऊ आशा स्वयं सेविकांचा सत्कार नुकताच शिशु विहार विद्या प्रसारक मंडळ संस्था,बदलापूर गांव येथे संजीवनी पाटील,अर्चना चोपडे,छाया कांबळे,माया निरगुडे,मोनिका गांगुर्डे,कविता मोसेकर,माया कांबळे,अश्विनी बनसोडे,रुपाली कांबळे यांना प्रमुख पाहुण्या शिशु विहार विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या अध्यक्षा विद्या साठे मॅडम व जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते आकर्षक”नवदुर्गा सन्मानपत्र”भेटवस्तू व शिशु विहार विद्या प्रसारक मंडळाच्यावतीने आरोग्य विषयक पुस्तक प्रदान करुन यथोचित सत्कार करण्यात आला.त्याप्रसंगी विद्या साठे मॅडम यांनी आशा स्वयं सेविकांना मोलाचं मार्गदर्शन केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच आशा स्वयं सेविकांच्या प्रमुख संजीवनी पाटील आशा सेविकांनी समाजात कशा प्रकारे काम करावे,समस्यांना कसे तोंड द्यावे,प्रतिकुल परिस्थितीत आपण कसे मार्गक्रमण करावे याचे सकारात्मक दृष्ट्या अनमोल मार्गदर्शन केले.याप्रसंगी ग्रुप लीडर संजीवनी पाटील,अर्चना चोपडे,छाया कांबळे,माया निरगुडे,मोनिका गांगुर्डे,कविता मोसेकर,माया कांबळे,अश्विनी बनसोडे,रुपाली कांबळे या आशा स्वयं सेविकांचे अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.