महिलांनी समाजातील प्रश्नांसाठी संघटित व्हावे:नगराध्यक्षा सौ.शुभांगीताई बन्नेवार
मल्हार क्रांती बहुउद्देशीय सेवा संस्थेची जत तालुका महिला कार्यकारिणी जाहीर!
माणगंगा न्यूज जत:-
मल्हार क्रांती बहुउद्देशीय सेवा संस्था महाराष्ट्र राज्य जत तालुका महिला पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.या पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे जतच्या नगराध्यक्षा सौ.शुभांगीताई बन्नेवार, संदिपभाऊ व्हनमाने,सुरेश टेंगले,सुखदेव काळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी महादेव बंडगर,आकाश चौगुले,ऋषिकेश कोळेकर,राहुल सरक,विशाल सौंदडे,रितेश लिंगले आदी समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना शुभांगी बन्नेवार मॅडम म्हणाल्या की,महिलांनी अहिल्याबाई होळकर, माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, माता रमाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन महिलांनी सामाजिक कार्य केले पाहिजे.तसेच यापुढे महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार.यासाठी महिलांनी समाजातील विविध प्रश्नांसाठी एकत्र येणे गरजेचे आहे.
जाहीर कार्यकारिणी खालीलप्रमाणे – तेजस्विनी व्हनमाने (सांगली जिल्हा अध्यक्ष),संगिता लेंगरे (जत तालुका अध्यक्ष), सुनिता गारळे (जत तालुका उपाध्यक्ष ),अनिता माने (जत तालुका युवती अध्यक्ष),सविता काबुगडे (जत तालुका सोशल मिडीया अध्यक्ष ), आरती व्हनमाने (जत शहर अध्यक्ष ),वर्षा माने (जत तालुका विद्यार्थी संघटना अध्यक्ष), फुलाबाई व्हनमाने(जत तालुका विधान सभा क्षेत्र अध्यक्ष ),आशाबाई खिलारे (जत तालुका संपर्क प्रमुख), साखरूबाई घोडके (जत तालुका उप संपर्क प्रमुख), आदी महिला पदाधिकरी यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.