आटपाडी गावामध्ये प्राचीन काळापासून 5 परमेश्वर मंदिरं जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहेत, ती ५ मंदिरं म्हणजे सोमेश्वर, नंदेश्वर, कल्लेश्वर, उत्तरेश्वर व परमेश्वर.
त्यापैकी सोमेश्वर मंदिरामुळे आटपाडी ग्रामपंचायत वार्ड नंबर 3 मध्ये बऱ्याच वर्षांपूर्वी सोमेश्वरनगर स्थापन झाले, त्यामुळे बऱ्याच वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करण्यात आली होती, परंतु काळानुसार सोमेश्वर नगरची लोकसंख्या वाढल्यामुळे विस्तार वाढला, त्यामुळे मोठी नवीन वाढीव पाईपलाईन करणे गरजेचे होते, आतापर्यंत नवीन वाढिव पाईपलाईन न केल्यामुळे येथील जुन्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नव्हते तसेच नवीन विस्तार झालेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती त्यामुळे तेथील नागरिकांच्या मागणीनुसार व गरजेनुसार आटपाडी ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगातून निधी मंजूर करून त्यांचे पाईप लाईन चे काम सुरू करण्यात आले, त्या कामाची पाहणी आटपाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांनी केली, यावेळी सोबत अखिल भारतीय सरपंच संघटनेचे सल्लागार ॲडवोकेट श्री. धनंजय लक्ष्मणराव पाटील, इंजिनिअर श्री.शेख साहेब, उपसरपंच प्रा.अंकुश कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. बाळासाहेब मेटकरी, श्री. प्रकाश मरगळे, श्री. विजय पाटील, श्री. राजेंद्र बालटे, श्री. उमाकांत देशमुख, जिल्हा प्राथमिक बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्री. यु. टी. जाधव सर,त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती अनिता उत्तम जाधव मॅडम, श्री. पीनु पंच उर्फ श्री. आप्पासाहेब माळी, श्री. मनोज देशपांडे, श्री. सुहास पाटील, श्री. सुखदेव पाटील व अन्य नागरिक उपस्थित होते.
आटपाडी गावातील आणखी काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे त्या सर्व ठिकाणी तसेच आटपाडी गावाचा झपाट्याने विस्तार झालेला आहे व काही ठिकाणी होत आहे त्या सर्व नवीन ठिकाणी नवीन पाईपलाईनचे काम आटपाडी ग्रामपंचायत मार्फत लवकरच करण्यात येणार आहे, तसेच आटपाडी गावातील काही ठिकाणी रस्त्याचा प्रश्न आहे ते रस्ते देखील थोड्याच दिवसात पूर्ण होणार आहेत त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांनी केले आहे.