आटपाडीत स्टॅम्प विक्रेत्याकडून ग्राहकांची लूट..
100 रुपयेच्या स्टॅम्पला 110 रुपये आकारणी, सहाय्यक निबंधकांचे दुर्लक्ष
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यांमध्ये स्टॅम्प विक्रेत्या कडून नागरिकांची लूट होत आहे शंभर रुपयांच्या स्टॅम्पला 10 रुपये जादा आकारणी केली जात आहे.
नागरिकांना विविध कारणासाठी स्टॅम्प ची गरज असते स्टॅम्प घेण्यासाठी दररोजच नागरिकांची गर्दी असते. याचाच फायदा घेत स्टॅम्प विक्रेते हे प्रत्येक स्टॅम्प मागे 10 रुपये जादा घेत आहेत. याकडे सहाय्यक निबंधक जाणून-बुजून दुर्लक्ष करीत आहेत.
तरी संबंधित अधिकाऱ्यानी याची दखल घेऊन संबंधित स्टॅम्प विक्रेत्यांना सूचना द्याव्यात व होणारी लूट थांबवावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे







