ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा शुद्ध पाण्याचा झरा म्हणजे गुरु
पाटोदा ;
आधी गुरूशी वंदावे मग साधन साधावे!
गुरु म्हणजे माय बाप नाम घेता हारती पाप!!
प्रथम गुरु ‘आई ‘व्दितीय गुरु प्राथमिक शाळेतील ‘गुरुजी’ तर तृतीय गुरु म्हणजे माध्यमिक शाळेतील’ सर ‘हे सर्व गुरु होत यांचे मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व आहे कारण प्रत्येक जण आपल्या गुरुला महत्व देतो गुरु शिवाय आपले जीवन सार्थकी लागत नाही
आईने मुलांना चांगले संस्कार केले तर मुलांना योग्य दिशा मिळते प्राथमिक शाळेतील गुरुजीने मुलांना चांगले अध्यापन केले तर मुले पुढे समाजात चमकतात लहानपणीच मुलांवर योग्य वयातच संस्काराची गरज असते वर्तमानपत्रात बातम्या येतात अपवाद एकादे गुरुजी मुलांना चांगले मार्गदर्शन करत नाहीत चक्क झोपा काढतात उलट अधिकारी शाळा तपासण्यासाठी आल्यावर मुलांनी गुरुजींना झोपेतून उठवले तेव्हा गुरुजींनी शक्कल लढविली शर्ट काढून विज्ञान शिकवू लागले याला म्हणतात उखळीचा सांधा याला म्हणतात गुडघ्याची वाटी हे गुरुजी चे प्रत्यक्षित अधिकाऱ्यांनी पाहिले म्हणून त्यांनी हे खरे हाडाचे शिक्षक आहेत म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार दिला. असे जर गुरुजी असतील तर भारत जगात एक नंबर का बरं बनणार नाही? माध्यमिक शाळेतील सर हेसुद्धा आदर्श असायला हवेत परंतु तेच जर गोवा गुटका खात असतील तर विद्यार्थी पुढे का बरं खाणार नाहीत? काही शिक्षक गोवा खात असल्यामुळे त्यांचे जीवनाचे वाटोळे झालेले पाहायला मिळतात भूमकर सर म्हणतात
विद्यार्थी शिक्षकांचे आता राहिले नाही नाते
दोन्ही पट्ट्यांचे एकाच टपरीवर खाते
वास्तविक पाहता ही परिस्थिती बदलली पाहिजे आमच्या काळात गुरुजी किंवा सर गल्लीत दिसले की आम्ही घरी धूम ठोकायची त्यांना घाबरायचं पण सध्याच्या काळात गुरुजींचा विद्यार्थ्यांवर धाकच राहिला नाही त्याला जबाबदार शासनच आहे कारण विद्यार्थ्यांना शिक्षा करायचे नाही आदेश आहेत
छडी लागे छम छम
विद्या येई घम घम
राहिल्या फक्त आठवणी पाठांतर करणे पूर्ण बुडाले आहे त्यामुळे विद्यार्थी बेशिस्त बनला गुरुजींना सध्याच्या काळात विद्यार्थ्यांची भीती वाटू लागली आहे एखाद्या विद्यार्थ्याला गुरुजीने शिक्षा केली तर त्याचे आई-वडील बाहया मागे सारून गुरुजींकडे येतात व बोलतात कशाला गुरुजी शिक्षा विद्यार्थ्यांना करतील आलं तर आलं नाहीतर नाही आलं आपल्या पगारात थोडीच घट होणार असे गुरुजींना वाटते त्यामुळे गुरुजी शिक्षा करत नाहीत. त्यामुळे आज समाजात पिढ्यानपिढ्या बरबाद होऊ लागल्याआहेत
सुशिक्षित बेकारांची संख्या वाढली आहे सरकार जागा भरेना तरुणांनी काय करावे कळेना याचा परिणाम तरुण पिढीवर महाभयंकर झाला तरुण पिढी गुन्हेगारीकडे ओळखताना दिसत आहे या पुढाऱ्यांनी तर तरुण पिढी बरबाद केली आहे निवडणुकीसाठी यांचा वापर करून घेऊन त्यांना व्यसनी बनवत आहेत ही तरुण पिढी यांना आपल्या आई-वडिलांचा ही विसरु लागली आहे त्यामुळे समाजात वृद्धाश्रमांची संख्या वाढू लागली आहे गुरुजी शिक्षक व सर यांचे आचारण शुद्ध असले पाहिजे
शेंबूड आपल्या नाकाला ब्रह्मज्ञान सांगे लोकांना
अशी परिस्थिती समाजात दिसून येत आहे म्हणून गुरुजी लोकांनी आदर्श पिढी निर्माण केली पाहिजे गु म्हणजे अंधकार रु म्हणजे नष्ट करणे गुरुजींनी विद्यार्थ्याच्या जीवनातील अंधकार दूर केला पाहिजे विद्यार्थ्यांचा सर्वांगाने विकास केला पाहिजे म्हणूनच आजच्या गुरु पौर्णिमेचा दिवस गुरुजन यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे गुरूला ब्रम्हा विष्णू व महेश यांची उपमा दिली आहे गुरु म्हणजे ज्ञानाचे भंडाराच आहे. भारतीय संस्कृतीला खूप मोठी गुरु परंपरा आहे छत्रपती शिवाजी राजे
यांच्या माता जिजाऊ या आदर्श गुरू होत्या.
तसेच द्रोणाचार्य हेही गुरु होते परंतु एकलव्याला त्यांनी धनुर्विद्या दिली नाही म्हणून त्याने मातीचा पुतळा तयार करून विद्या घेतली आणि पांडवा पेक्षाही श्रेष्ठ ठरला केवळ गुरु वरील श्रद्धेमुळे . समाजात नक्कीच गुरुची किंमत प्रत्येक जण आपल्या गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करेल पण नाही मोबाईल मुळे विद्यार्थी आळशी बनले आहेत वाममार्गाला लागले आहेत गुरुला विसरले आहेत गुरुजींचे आचारण शुद्ध व चारित्र्य संपन्न असले पाहिजे तरच समाजात त्यांची प्रतिष्ठा नक्कीच वाढेल आदी गुरूशी वंदावे मग साधनं साधावे!
गुरु म्हणजे माय बाप नाम घेता हरतील ताप!
गुरु म्हणजे आहे काशी साती तीर्थ तया पासी!
तुका म्हणे ऐसे गुरु चरण त्यांचे हृदयी धरु
श्री संजय एलकनाथ सावंत बंकटस्वामी विद्यालय खडकी घाट पाटोदा







