• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

चिमुकल्यांचे ‘एक मूठ धान्य’, भटकंती कारागिरांचे गहिवरले मन

माणगंगा by माणगंगा
November 22, 2022
in सांगली
0
चिमुकल्यांचे ‘एक मूठ धान्य’, भटकंती कारागिरांचे गहिवरले मन

चिमुकल्यांचे ‘एक मूठ धान्य’, भटकंती कारागिरांचे गहिवरले मन


शेटफळे गावामध्ये गदिमा स्मारकानजीक भटकंती कारागीरांची दोन पाले गेल्या काही दिवसापासून वास्तव्यास आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा उघड्यावर संसार थाटून आपली उपजीविका चालवण्यासाठी ही कुटुंबे काबाडकष्ट करून पोट भरत आहेत.

शेतीची अवजारे दुरुस्त करण्याचा व्यवसाय असणाऱ्या या कुटुंबांना सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे म्हणावे तसे काम मिळत नाही. या पालातील लोकांचे हाल गावातील विद्यार्थी, नागरिक, शिक्षक, ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांच्या रोजच दृष्टीस पडत होते. अशातच शेटफळे गावचे उपसरपंच श्री विजय देवकर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.2 शेटफळे चा शिक्षक स्टाफ यांच्या चर्चेतून या गरजू कुटुंबाच्या मदतीसाठी एक मूठ धान्य हा उपक्रम राबवण्याचे ठरले.

शाळा नंबर दोन शेटफळेच्या विद्यार्थिनी समोर ही कल्पना मांडण्यात आली. शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी आणि त्यांच्या पालकांनी या उपक्रमांमध्ये उत्साहाने आणि हिरीरीने सहभाग घेतला आणि बघता बघता गरजूंसाठी मदतीचे हात उभे राहिले. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ अशा प्रकारचे धान्य गोळा झाले.


आज दिनांक 22 नोव्हेंबर 2022 रोजी हे गोळा झालेले धान्य शेटफळे गावचे उपसरपंच श्री. विजय देवकर सर तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री. सोमनाथ गायकवाड, शेटफळे गावचे पोलीस पाटील श्री दत्तात्रय क्षीरसागर, प्राध्यापक श्री चंद्रकांत गायकवाड, श्री. शिवाजी गायकवाड, श्री. रणजीत गायकवाड, श्री सुनील गायकवाड,श्री.भागवत गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ कोमल गायकवाड शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुवर्णा पाटील मॅडम, शिक्षिका सौ राणी गायकवाड मॅडम, श्री जयवंत बंडगर सर, श्री सत्यवान माने सर, श्री. सागर नागणे सर, सौ. तेजश्री कदम मॅडम, श्रीमती. परविन बेगम पटेल मॅडम आणि विद्यार्थिनी यांचे उपस्थितीत गरजूंना धान्य देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सत्यवान माने सर यांनी केले आणि मनोगत शेटफळे गावचे उपसरपंच श्री विजय देवकर यांनी व्यक्त केले. या प्रसंगी विनायक पवार आणि शंकर साळुंखे या मूळ तुळजापूरचे रहिवासी असणाऱ्या वयोवृद्ध भटकंती कारागीरांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. चिमुकल्यांच्या मदतीचा हात त्यांना भावुक करून गेला आणि प्रात्यक्षिकातून नैतिक मूल्यांची रुजवणुक विद्यार्थिनींमध्ये करण्याचा हा छोटासा उपक्रम उपस्थितांच्या दृष्टीने कौतुकास्पद ठरला.

Views: 90
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
महात्मा फुले मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी –अविनाश ठाकरे–निमंत्रक पदी गणेश जगताप व सुनील धिवार यांची निवड

महात्मा फुले मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी --अविनाश ठाकरे--निमंत्रक पदी गणेश जगताप व सुनील धिवार यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)