• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

टमाटेच्या दरात घसरण, खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल

माणगंगा by माणगंगा
November 23, 2022
in महाराष्ट्र
0
टमाटेच्या दरात घसरण, खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल

टमाटेच्या दरात घसरण, खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल

भर पावसाच्या  वातावरणातही पिक वाचविलेल्या टोमॅटो उत्पादकांना चांगल्या बाजाराने 2 महिन्यांपर्यंत दिलासा दिला. खर्च निघून येईल अशी आशा मनात असतांनाच दिवाळीनंतर मार्केट डाऊन झाले आहे. मागील वर्षी आधीच संपलेला बेंगलोरचा टोमॅटो हंगाम यावर्षी नेमका आताच सुरु झाला आहे. देशातील टोमॅटो व्यापारी खरेदीदार निर्यातदार हे कर्नाटककडे वळले असल्याने ही उतरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केलेला खर्च वसूल होत नसल्याने हवालदिल झाले आहे 

मागील काही वर्षे तेजीचे मिळाल्यामुळे यंदा धुळे भागातील टोमॅटो उत्पादकांत दांडगा उत्साह होता. वातावरणातील बदलाने सतत फटका दिल्यामुळे पारंपारिक पपई उत्पादकही बागा तोडून टोमॅटोकडे वळले होते. त्यामुळे लागवड अर्थातच वाढलेली होती. यंदाच्या जोरदार पावसाने त्यातही चित्रा नक्षत्रातील पावसाच्या परतीच्या तडाख्याने उत्साहाची हवा बरीच कमी केली. या काळात पिक वाचवण्यासाठी या शेतकऱ्यांनी जीवाचे रान केले. औषधे, खते, मजुरी यासाठीचा खर्च यंदा दीड ते 2 पटीपर्यंत वाढला. त्यातही काही वाणांनी मोठाच दगा दिला. बरेच प्लॉट मर, सुकवा या रोगांना बळी पडले. याही परिस्थितीतून वाचलेल्या टोमॅटो उत्पादकांना प्रति क्रेटला 500 ते 600 रुपये दर मिळत असल्याने त्यातही दिलासा होता.

मागील काही दिवसांपासून या तेजीलाही ग्रहण लागले आहे. टोमॅटोचे प्रति क्रेटचे दर कमाल 800 वरुन हे दर कमाल 100 पर्यंत म्हणजे खाली आले आहेत. 

दर का घसरलेत?

बेंगलोरचा नुकताच सुरु झालेला हंगाम तसेच मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील स्थानिक टोमॅटोची आवक ही दर उतरण्यामागील मुख्य कारणे व्यापाऱ्यांकडून सांगितली जात आहेत.

मागील वर्षी महाराष्ट्र वगळता इतर राज्यातील टोमॅटो उत्पादक पट्टयाचे जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले होते. यामुळे बेंगलोर हंगाम अगोदरच आटोपला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील विशेषत: धुळे भागातील टोमॅटोला देशभरातून मागणी होती. परिणामी टोमॅटोला शेवटपर्यंत चांगले दर मिळाले. मागील वर्षीचा धडा घेऊन बेंगलोर भागातील उत्पादकांनी लागवड उशिराच्या केल्या. तो माल मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दीड ते 2 महिन्यांनी म्हणजे ऐन दिवाळीत बाजारात येण्यास सुरवात झाली आहे. कर्नाटक भागातील बहुतांश लाल मातीत येणारा तेथील स्थानिक टोमॅटो एक सारखा रंगात येत आहे. त्यामुळे त्याला पसंती मिळत आहे तसेच धुळेच्या तुलनेत काहीशा कमी दरात मिळत असल्याने धुळे भागातील टोमॅटोच्या व्यापारी खरेदीदारांनी बेंगलोरकडे मोर्चा वळवला आहे.

निर्यात घटली आहे.

बांग्लादेश हा भारतीय टोमॅटोसाठी सर्वात महत्वाचा खरेदीदार देश राहिला आहे. मागील 4-5 वर्षांपासून दोन्ही देशातील हा व्यापारही अडचणीत आलेला आहे. बांग्लादेशाने वाढविलेला 34 टक्के हा आयातकर हे त्यामागील प्रमुख कारण आहे. परिणामी टोमॅटोची ही निर्यात मंदावलेली आहे. गिरणारे, धुळे, नंदुरबार, जळगाव, च्या बाजारातून बांग्लादेशाकडे होणाऱ्या निर्यातीत 70 टक्क्यांनी घट झाली आहे. हा माल गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांत देशांतर्गत बाजारात विकण्याचा पर्याय स्विकारला जात आहे. मात्र या बाजारातून अपेक्षित उठाव होत नसल्याचे व्यापारी सांगतात.

–

Views: 97
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
अठरा वर्ष पूर्ण झालेल्या नवीन मतदारांनी मतदान नोंदणी करुण घ्यावी- रावसाहेब चव्हाण

अठरा वर्ष पूर्ण झालेल्या नवीन मतदारांनी मतदान नोंदणी करुण घ्यावी- रावसाहेब चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)