अठरा वर्ष पूर्ण झालेल्या नवीन मतदारांनी मतदान नोंदणी करुण घ्यावी- रावसाहेब चव्हाण
त-हाडी / प्रतिनिधी
राज्य निवडणुक आयोगामार्फत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लक्षात घेता नव्याने मतदार याद्या अद्यावत करण्याचे काम सुरू करण्यात आले असुन. ज्या युवक-युवतींचे वय १ जानेवारी २०२२ पर्यंत १८ वर्ष पुर्ण झाले आहे त्यांनी मतदार यादित नविन नावे नोंदवावेत तसेच नाव, पत्ता, यांची दुरुस्ती व ज्यांचे नाव कमी करायचे आहे ते नावे कमी करता येईल असे अवाहन मराठा कुणबी पाटील बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रावसाहेब चव्हाण यांनी केले आहे. ज्यांचे नाव नव्याने मतदार यादित नोंदवायचे आहे त्यांनी नमुना क्रमांक ६ चा फॉर्म भरावा. या साठी वयाच्या पुराव्यासाठी टिसी, आधारकार्ड, रहिवासी प्रमाणपत्र २ पासपोर्ट फोटो, कुटुंबातील सदस्याचा नातेवाईकांचा मतदानाचा पुरावा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.ज्यांना मतदार यादितुन आपले
नाव कमी करायचे आहे त्यांनी नमुना क्रमांक ७ हा फॉर्म भरावा.ज्यांना नाव व पत्याची दुरूस्त करायची आहे त्यांनी नमुना क्रमांक ८ चा फॉर्म भरून आपल्या प्रभगाती बि, एल, ओ किवा
तहसील कार्यालयात दाखल करावेत. व जास्तीत जास्त युवक-युवती व नवीन मतदारांनी भारतीय लोकशाही अधिक भक्कम करण्यांसाठी, आपल्याला आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपले नाव नविन मतदार यादित नक्कीच समाविष्ट करून घ्यावेत असे आवाहन
रावसाहेब चव्हाण
यांनी १८ वर्ष पुर्ण झालेल्या युवक-युवती व नवीन मतदारांना केले आहे. नवीन नावे नोंदविण्या करीता जवळील बि,एल ओ, बुथ एजंट किंवा तहसीलकार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन रावसाहेब चव्हाण
यांनी नवीन मतदारांना केले आहे..!







