भोरखेडा विद्यालयात भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन व व्याख्यान
त-हाडी
आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत भोरखेडा येथे 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य आर एफ शिरसाठ यांनी केले कु अक्षरा राजपूत या विद्यार्थिनीने संविधान उद्देशिकेचे वाचन केले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान या विषयावर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी एन वाय बोरसे यांनी भारतीय संविधान निर्मिती मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महत्त्वपूर्ण भूमिका व त्यासाठी चे कार्य आणि उद्देश याचे महत्व तसेच भारतीय नागरिकाचे हक्क आणि कर्तव्य या मार्गदर्शक कलमांचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पर्यवेक्षक पी व्ही पाटील यांनी संविधान निर्मितीची प्रक्रियेची माहिती दिली
प्राचार्य आर एफ शिरसाठ यांनी बालकांच्या शिक्षणाच्या हक्काविषयी विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायदा व शिक्षणाचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची जाणीव करून दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस आर देसले यांनी केले आभार एस के कोळी यांनी मानले यावेळी एन डी चव्हाण,डी आर राजपूत,आर जी पाटील,एस जे पाटील,एस एन पाटील, मीना पटेल, दिपाली निकम,काजल राजपूत, व्ही बी शर्मा, एस एम पाटील,पी टी चौधरी, व्ही एस येशी, व्ही डी पाटील, जे डी पाटील,तुषार पाटील,चंदन पावरा,आफ्रिद पटेल ए एम काझी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते







