टेकवाडे आर सी पटेल प्राथमिक विद्यालयात संविधान दिवस साजरा
त-हाडी
आर सी पटेल प्राथमिक विद्यालय टेकवाडे येथे २६ नोव्हेंबर हा ‘संविधान दिवस’ साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे प्राचार्य श्री एन.सी.पवार सर होते. त्यांच्या शुभहस्ते भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान प्रास्ताविकेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संविधान प्रास्ताकाचे वाचन केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री आर.बी.खोंडे यांनी संविधानाबद्दल मार्गदर्शन केले.तसेच शालेय व्यवस्थापन समिती शिक्षणतज्ञ सदस्य प्रा.श्री एस.एम.पाटील यांनी संविधान दिनाचे महत्त्व विविध उदाहरणे देवून विद्यार्थ्यांना समजावले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयापासून गावात संविधानाबद्दल घोषणा देत जनजागृती रॅली काढण्यात आली सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक श्री एस.एस.पटेल,श्री ए.एस.माळी,उपशिक्षिका श्रीमती एस.जे.सोनार,श्रीमती जे.पी.पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री बी.एल.पावरा,श्री ए.बी.ईशी यांचे सहकार्य लाभले.







