गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याचा हायकोर्टाचा निर्णय
महाराष्ट्र राज्यातील काही भागात गायरान जमिनीवरील अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात झाले असून काही जमिनदार नोकरदार पुढारी अशा लोकांनी पण अतिक्रमण करून घरे बंगले बांधले आहेत व गरीब गरजू पहील्यापासूनच राहिलेले आहेत
पण आता हायकोर्टाने सरसकट घरे काढण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे प्रत्येक गावात ग्रामपंचायतीकडून नोटीस देण्यात येत आहेत.नोटीसीमुळे सामान्य जनता घाबरलेली आहे.दहा दिवसांत सर्व साहित्य घरे काढण्यात यावी असं ग्रामपंचायतीकडून बजावण्यात येत आहे.
गोर गरीब भुमीहीन मजूर कामगार यांनी कुठे जायचे व आयुष्यभर कष्ट करून उभा केलेला हा संसार उद्धवस्त झाल्यानंतर तो परत कसा उभा करायचा अशी चिंता व भीती ग्रामीण भागात दिसून येत आहे तरी शासनाने गोरगरीब जनतेसाठी बांधलेली घरे कायम करावी अशी चर्चा जनमानसात सूरु आहे.
हायकोर्टाने दिलेला निकाल सर्वच ग्रामपंचायत अमलात आणतील असे होताना दिसणार नाही. कारण मताच्या जोगव्यासाठी गावगुंड अतिक्रमण काढण्यासधजवणार नाहीत







