दो और दो पांच नही पाच म्हणजेच चार आटपाडीच्या बांधकाम विभागाचं नवसंशोधन
काही वर्षांपूर्वी दो और दो पाच अशा नावाचा एक चित्रपट आला होता या चित्रपटाचं नाव ऐकून सुरुवातीला तर अनेकांच्या भुवया उंच होत होत्या मात्र आता आटपाडी तालुक्यातील बांधकाम विभागाच्या नवीन सूत्रानुसार आता पाच म्हणजेच चार असं संशोधन केलं आहे त्यांनी हे संशोधन कसं केलं आहे
त्याचा फॉर्मुला समोर आलेला आहे त्याच्यासाठी आपणाला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आटपाडी ते लेंगरेवाडी या रस्त्याच्या सुरुवातीला लावलेला फलक आपणाला पहावा लागेल या फलकामध्ये सुरुवातीला देखभाल दुरुस्ती कालावधी सुरुवात 28 3 18 असं लिहिलेला आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बनणाऱ्या रस्त्याचा देखभाल दुरुस्ती कालावधी पाच वर्षाचा असतो तर खालच्या बाजूला एक टेबल दिलेला आहे त्यामध्ये पाच वर्षाच्या देखभाल दुरुस्ती कालावधी व त्यासाठी तरतूद असलेल्या रकमेची माहिती दिलेली आहे पहिलं वर्ष 2017 18 लिहिलेला आहे
साधारणपणे आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असं मोजलं जातं मात्र या ठिकाणी आपण वर पाहिलं तर देखभाल दुरुस्ती 28 मार्चपासून सुरू होते आणि 31 मार्चला संपते चार दिवसांमध्ये यांनी एक वर्ष पूर्ण केलेला आहे तसं पाहिलं तर देखभाल दुरुस्ती कालावधी हा 2018 19 पासून धरायला पाहिजे होता मात्र बांधकाम विभागाच्या करेक्ट शिस्तीमुळे पाच वर्षाचा देखभाल दुरुस्ती कालावधी यांनी चार वर्षातच पूर्ण केला आहे त्यामुळे बांधकाम विभागाच्या या अति हुशार इंजिनीयर यांना कोणता पुरस्कार द्यावा हे आता आपणच सुचवावे







