त-हाडीत स्वच्छतेच्या घंटागाडीचे लोकार्पण
त-हाडी प्रतिनिधी : शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून बुधवारी (दि. ३०) संपूर्ण गावातील कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीने नागरिकांसाठी नवीन घंटा गाडी उपलब्ध करून दिली. ग्रामपंचायतीचे कार्यालयासमोर त-हाडी ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच . – जयश्री सुनिल धनगर, उपसरपंच उजनबाई अहिरे यांच्या हस्ते पुजा करून या घंटा गाडीचे लोकार्पण करण्यात आले.
त-हाडी गाव कचरा मुक्तीच्या व स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल करील अशी अपेक्षा युवा मल्हार सेना धुळे जिल्हा उपाध्यक्ष सुनील धनगर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.यावेळी जयश्री धनगर ,उपसरपंच उजनबाई अहिरे,,ग्रामपंचायत सदस्य मंगलबाई भिल, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष तुळशिराम भामरे उपध्यक्ष युवराज भलकार पोलिस पाटील प्रतापसिंह गिरासे, तापी विद्या प्रसारक मंडळ संस्थाचे अध्यक्ष सुभाष भामरे, मराठा कुणबी पाटील बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रावसाहेब चव्हाण, शालिग्राम पाटील, गुलाब सोनवणे, आबा शिंदे गुलाब भलकार सुनिल भामरे, बालु सोनवणे आदींसह ग्रामस्थ माेठ्या संख्येने उपस्थित होते.
त-हाडी येथे ग्रामपंचायतीचे पंधराव्या वित्त आयोगातून स्वच्छतेच्या घंटागाडीचे लोकार्पण सरपंच जयश्री धनगर, उपसरपंच उजनबाई अहिरे ग्रामपंचायत सदस्य मंगलबाई भिल युवा मल्हार सेना धुळे जिल्हा उपाध्यक्ष,सुनिल धनगर तंटामुक्त अध्यक्ष, उपध्यक्ष युवराज भलकार तुळशिराम भामरे, पोलिस पाटील प्रतापसिंह गिरासे तापी विद्या प्रसारक संस्था अध्यक्ष सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते (छायाचित्र – महेंद्र खोंडे )







