• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

महावितरणने आणले शेतकऱ्यांना अडचणीत; ऐन रब्बी हंगामात वीज पुरवठा खंडित होण्याच्या मार्गावर

माणगंगा by माणगंगा
December 3, 2022
in महाराष्ट्र
0
महावितरणने आणले शेतकऱ्यांना अडचणीत; ऐन रब्बी हंगामात वीज पुरवठा खंडित होण्याच्या मार्गावर

महावितरणने आणले शेतकऱ्यांना अडचणीत; ऐन रब्बी हंगामात वीज पुरवठा खंडित होण्याच्या मार्गावर

त-हाडी प्रतिनिधी : नैसर्गिक संकटाचा सामना करताना शेतकऱ्यांची दमछाक सुरु आहे. पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. अशा अवस्थेत देखील रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरवात झाली आहे. असे असताना ऐन रब्बी हंगामात वीज पुरवठा खंडित होण्याच्या मार्गावर असल्याने आता नवेच संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. आतापर्यंत शेतीसाठी दहा तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र, ऐन रब्बीच्या तोंडावरच यामध्ये बदल करण्यात आला असून आता केवळ आठ तास वीजपुरवठा राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.


निसर्गाच्या संकटानंतर आता महावितरणनेही शेतकऱ्यांना संकटात आणले आहे.
रब्बी पिकांची जोपासना करण्यासाठी यंदा शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. त्यामुळे उत्पादन वाढेल, अशी आशा आहे. मात्र, आता महावितरण कंपनीने हा नविन निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होणार आहे.


यंदाच नाही तर दरवर्षी रब्बी हंगामाला सुरवात झाली की, महावितणकडून हा निर्णय घेतला जातो. सिंगल फेज योजनेमुळे गावातील विद्युतपुरवठा हा सुरळीत होतो, पण कृषीपंपाचा पुरवठा हा दोन तासांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पाणीसाठा असतानाही अडचणी निर्माण होणार आहेत.
यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने रब्बीच्या क्षेत्रातही वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवलेला आहे. त्यामुळे साहजिकच क्षेत्र वाढले तर कृषीपंपाचा वापर हा करावा लागणार आहे

.
दिवसभरात मिळणार आठ तासच वीजखरीप हंगामात वीजेची आवश्यकता भासत नाही. पावसामुळे पिकांनाही पाणी मिळते, मात्र रब्बी हंगामातील पिकांची जोपासना ही साठवणुकीच्या पाण्यावरच करावी लागते. यातच सध्या वाढत्या उन्हामुळे पेरणी करण्यापूर्वी आणि पेरल्यानंतरही पाणी द्यावे लागणार आहे.


आतापर्यंत १० तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र, एक नोव्हेंबरपासून नियमात बदल करुन शेतीसाठी ८ तासच विद्युतपुरवठा राहणार आहे. यामुळे घेण्यात आला निर्णयमहावितरणच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कमी वेळेत अधिकचे भरणे कसे होईल, याचे नियोजन करावे लागणार आहे. काळाच्या ओघात सिंचनासाठी आता स्प्रिक्लर, ठिंबकचा वापर वाढलेला आहे. मात्र, शेतकरी अत्याधुनिक पध्दतीचा अवलंब करीत असला तरी वीज ही गरजेची आहेच. पण कोळसा टंचाईचे कारण पुढे करीत ही वीज कपात करण्यात आली आहे, असे सांगण्यात येत असले तरी मात्र ८ तासही सुरळीत पुरवठा होत नसल्याने यंदा महाविरणच्या निर्णयामुळे रब्बीच्या उत्पादनात घट होऊ नये म्हणजे झालं.


ट्रान्सफॉर्मर जळल्यास बिल भरा’एका ट्रान्सफॉर्मरवरून १० ते १५ शेतकऱ्यांचे कृषी पंपाचा वीजपुरवठा केला जातो. अशात तांत्रिक कारणामुळे ट्रान्सफॉर्मर बिघडले की शेतकऱ्यांना बिल भरण्यास सांगण्यात येते. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची महावितरण ही अडचणींचा लाभ उचलत असून त्यांनी बिल भरल्याशिवाय नवीन ट्रान्सफॉर्मर लावण्यात येत नाही व यासाठी आठ ते पंधरा दिवस लागत असल्याने शेतकऱ्यांना सिंचन करता येत नाही व त्याचे नुकसान होत आहे.

Views: 161
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
तऱ्हाडी विद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनातारांकित अकॅडमी संस्थापक मनोज पाटील यांनी केले मार्गदर्शन

तऱ्हाडी विद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना
तारांकित अकॅडमी संस्थापक मनोज पाटील यांनी केले मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)