गावरान गायीचे अस्तित्व संपण्याच्या वाटेवर;
संकरित गायीची मागणी वाढली
त-हाडी प्रतिनिधी : यांत्रिकीकरणाच्या युगात पशुधनाची संख्या घटत आहे. यातही दूध उत्पादनात पशुपालकांनी गायीची संख्या वाढविली आहे. पूर्वीच्या तुलनेत या संख्येमध्ये चार पटीने वाढ नोंदविण्यात आली आहे. यासोबतच देशी गायीची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याची धक्कादायक बाबही सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
देशी गायीचे दूध, तूप, शेणखत याची मोठ्या प्रमाणात मागणी असते. सेंद्रिय उत्पादनात आणि पाैष्टिक आहारासाठी देशी गायीच्या दूध उत्पादनाला मागणी आहे; मात्र यातून फारसे उत्पादन येत नाही. त्या तुलनेत संकरित गायीच्या दुधाचे उत्पादन सर्वाधिक आहे. यातूनच गोपालकांनी संकरित गायीची संख्या वाढविली आहे. त्यामुळे दूध संकलन केंद्रावर संकरित गायीचे दूध सहज उपलब्ध होते. तर म्हैस आणि देशी गायीच्या दुधाकडे पिछेहाट पाहायला मिळते.
संकरित गायीचे दूध किती पाैष्टिक?
देशी गायीच्या तुलनेत संकरित गायींची संख्या चारपट वाढली आहे. जिल्हाभरात संकरित गायीचे दूध वितरित होते. देशी गायीच्या दुधाला आणि तुपाला सर्वाधिक मागणी आहे; मात्र देशी गायीच्या दुधाचे उत्पादन कमी आहे. देशी गायी वाढविण्यावर पशुपालकांचा भर राहिलेला नाही. उत्पादन मिळवून देणाऱ्या संकरित गायीकडे लक्ष आहे.







