बंकटस्वामी विद्यालय खडकी घाट विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा.
खडकीघाट तालुका जिल्हा बीड येथील बंकटस्वामी विद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा “महापरिनिर्वाण दिन,” साजरा करण्यात आला.सर्वप्रथम जेष्ठ शिक्षक श्री उंदरे सर श्री रिंगणे सर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.नंतर काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित भाषणेही केली.तसेच काही शिक्षक यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.







