निंबवडे जि.प.शाळेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त वार्षिक तपासणी
आटपाडी प्रतिनिधी
निंबवडे ता.आटपाडी येथे येथे वार्षिक तपासणीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
प्रतिमेचे पूजन गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी मैनाताई गायकवाड ,विस्ताराधिकारी सुभद्रा गायकवाड , शिक्षण विस्तार अधिकारी हसबे साहेब ,शिक्षण विभाग पंचायत समितीचा सर्व अधिकारी वर्ग, BRC चा सर्व स्टाफ व दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक विद्यार्थी. उपस्थित होते
यावेळी विद्यार्थी अनुष्का जावीर, राहुल पिसे यांची व शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली. मैनाताई गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना व शाळेला संबोधित मार्गदर्शन केले.
यावेळी निंबवडे शाळा नंबर 2 चे उपशिक्षक प्रमोद देठे यांनी मैनाताई गायकवाड मॅडम यांचा स्वतः पेन्सिल स्केच ने काढलेला फोटो फ्रेम भेट देण्यात आला. शाळा नं १चे उपशिक्षक महेश इंगवले यांनी राज्यस्तरीय नवोपक्रमात भाग घेतला असून त्या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर त्यांचा सत्कार गायकवाड यांनी केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. गटशिक्षण अधिकारी दत्तात्रय मोरे यांनी ही नमोपक्रमाची पाहणी केली असता समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
दोन्ही शाळेची आज वार्षिक तपासणी उत्तमरीत्या करण्यात आली या निमित्ताने शाळेच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वरील अधिकारी वर्गाने समाधान व्यक्त केले







