• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

” लाईटसाठी शेतकऱ्याची रब्बीची जीवघेणी नाईट …”
स्पेशल ग्राउंड रिपोर्ट थेट शेतकऱ्याच्या बांधावरून…’

माणगंगा by माणगंगा
December 8, 2022
in महाराष्ट्र
0
” लाईटसाठी शेतकऱ्याची रब्बीची जीवघेणी नाईट …”स्पेशल ग्राउंड रिपोर्ट थेट शेतकऱ्याच्या बांधावरून…’

” लाईटसाठी शेतकऱ्याची रब्बीची जीवघेणी नाईट …”
स्पेशल ग्राउंड रिपोर्ट थेट शेतकऱ्याच्या बांधावरून…’

महेंद्र खोंडे,


त-हाडी :- शेतकऱ्यांच्या भरवशावर सारं जग पोटभर जेवण करून रात्रीची गाढ झोप काढत असले तरी मातीतून अन्न पिकविणारा जगाचा पोशिंदा पोटभर जेवण करून खरंच रात्री झोपतो का,याची कुणालाही चिंता नसून गाढ झोपेतील सरकार शेतकऱ्यांना रात्री बारा बारा,एक एक वाजता रब्बी पिकांसाठी वीज देऊन शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करत आहे.विशेष म्हणजे किर्रर्र अंधारात,कडाक्याच्या थंडीत, वन्यप्राण्यांच्या भीतीत उपाशी पोटी शेकोटीचा आधार घेऊन हा जगाचा पोशिंदा रब्बीसाठी पूर्ण नाईट पालथी घालत असल्याचे चित्र रात्रपाळीसाठी जागरण करत असलेल्या शेताच्या बांधावर गेल्यानंतर पहावयास मिळाले आहे.


एकीकडे कोणतेही सरकार सत्तेत येणाच्या अगोदर शेतकऱ्यांना लोडशेडिंग कमी करण्यासोबतच दिवसा वीज देण्याच्या घोषणेचे किंवा संपूर्ण कर्जमाफीचे गाजर दाखवून सत्तेतील खुर्चीवर बसल्यानंतर घुमजाव करत असल्याचे अनुभव शेतकऱ्यांना आहेत.यावर्षी खरीप हंगामात पावसाने धुमाकूळ घातल्याने पिकांची नासाडी झाली आहे.

नदी नाले,तलाव व धरणात सद्या पाणी साचलेले असल्याने खरिपातील हातातून गेलेल्या पिकाची भरपाई भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांची मदार रब्बीकडे वळली असतांनाच सद्या रात्रीच्या विज देण्याच्या उदासीन धोरणामुळे बळीराजा त्रस्त झाला आहे.रात्र रात्र जागून त्याला रब्बीचे पीक जगविण्याची धडपड ही आजरोजी करावी लागत असून शेतकरी पुरता यातून हवालदिल झाला आहे.त्याचे आजचे नाईट लाइफ कसे असते याविषयी शेतकऱ्याच्या थेट बांधावर रात्रीला जाऊन जाणून घेतले असता रब्बीला रात्रीचे पाणी देतांना जीव धोक्यात घालून बळीराजा किर्रर्र अंधारात,कडाक्याच्या थंडीत हलाखीचे जीवन जगत हिंस्रपशूंच्या भीतीत रात्रभर जागरण करत आहे.

आजरोजी आठवड्यातून अर्ध्यापेक्षा अधिक दिवस ही रात्रीची वीज मिळत असून रात्री बारा बारा,एक एक वाजेपासून येणाऱ्या या लाइटमुळे शेतकऱ्याचे नाईट लाइफ सुरू होत नाही तोच जास्तीचा भार हा वीज रोहित्रांवर येत असल्याने फ्यूज उडण्याच्या प्रकारातून ओल्या ठिकाणी जीव मुठीत धरून हे फ्यूज रात्री टाकावे लागत आहेत.अंधाऱ्या रात्री अनवाणी पायातून उभ्या पिकातून विंचू काट्याची पर्वा न करता पीक वाचविण्याची कसरत या बळीराजाला करावी लागत आहे.सद्या सगळीकडे वन्यप्राण्यांचा खुला संचार सुरू असतांना व दुसरीकडे AC रूममधून आपली ड्युटी बजावून रात्रीच्याच AC रूमच्या बळीराजाने पिकविलेल्या अन्नावर ताव मारून गाढ झोपी जाणाऱ्या अधिकारी व राजकीय पुढाऱ्यांना सुखाची झोप लागत असतांना मात्र शेतकरी अर्धपोटी हलाखीचे जीवन जगत असतांना त्यांचा वाली कोणीच नसल्याचे चित्र आहे.

एकीकडे उद्योगधंद्यांना दिवसभर वीज मिळत असतांना शेतकऱ्यांना रात्रीचे वीज देऊन त्याची अवहेलना केली जात आहे.शेतकरी येणाऱ्या संकटाचा कसा सामना करतो याविषयी थेट शेतकऱ्याच्या बाधावरून रिपोर्टिग करुण शेतकऱ्याच्या समस्या काय असतात हे जाणुन घेतले.तेव्हा रात्रभर जागूनही विजेचे येणेजाणे किंवा इतर डिपींच्या नादुरुस्त पणामुळे जागरण करुनही हाती काहीच लागत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.सद्या रात्रीची आठ तासासाठी मिळणारी वीज व त्यातच वेळोवेळी होणारे अघोषित भारनियमन शेतकऱ्यांचे सर्वस्व लुटून नेताना दिसून येत आहे.

लाईट साठी जागावी लागते नाईट…


” यावर्षी पावसाळा चांगला झाल्याने विहिरींना पाणी आहे,त्यामुळे आम्ही गहू,मका व हरभरा पीक पेरले आहे.मात्र दिवसा तर लाईट टिकतच नाही व रात्री १२.४५ वाजता वीज मिळते तेव्हा न झोपता ती वेळ साधत पिकांना जागरण करून पाणी द्यावे लागत आहे.”

किरण मराठे
,शेतकरी,त-हाडकसबे (अभानपुर शिवार)

“दिवसभर शेतात काम करून रात्री बेरात्री शेतात रब्बी पिकांना वाचविण्याची कसरत आम्हा शेतकऱ्यांवर असल्याने शासनाने बळीराजाचा सहानुभूती पूर्वक विचार करून दिवसा वीज द्यावी.”

नियुक्ती शिक्षक नानाभाऊ खडु पाटील शेतकरी, जवखेडा ( वरुळ शिवार. )

Views: 211
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
घोटीखुर्द येथील बिनविरोध, लोकनियुक्त नूतन सरपंच सिंधु गवळी यांचा आमदार गोपीचंद पडळकर यांचे हस्ते सन्मान

घोटीखुर्द येथील बिनविरोध, लोकनियुक्त नूतन सरपंच सिंधु गवळी यांचा आमदार गोपीचंद पडळकर यांचे हस्ते सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)