आटपाडी नगरपंचायतच्या सर्वांगीण विकासासाठी छपर फाडके निधी
42 कामांना साडेआठ कोटी मंजूर – तानाजीराव पाटील
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी नगरपंचायतीची घोषणा झाल्यापासून निधी आणण्यासाठी स्पर्धाच लागली आहे. यामध्ये आटपाडी नगरपंचायत च्या सर्वांगीण विकासासाठी साडेआठ कोटीचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती अध्यक्ष व सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी दिली.



यापूर्वीही विविध विकास कामासाठी निधी आणला होता, परंतु आणखी निधी कमी पडत असल्याने खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून आटपाडी नगरपंचायत च्या विविध विकास कामासाठी साडेआठ कोटीचा निधी मंजूर झाला आहे.
या कामाची निविदा लवकरच निघून प्रत्यक्षात कामाला सुरुवात लवकरच होईल अशी माहिती सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी दिली
पुढील प्रमाणे विकास कामाचा समावेश आहे सिद्धनाथ मंदिर ते रत्नाकर रामदास घर रस्ता करणे, साठेनगर येथे अंतर्गत रस्ते गटार व लादीकरण करणे, दिघंची रोड ते आवळाई रोड रस्ता करणे, बायपास रोड मगर वस्ती ते तानाजी मगर रस्ता करणे, किरण सूर्यवंशी घर ते गुरु देशमुख घर रस्ता करणे, सांगोला रोड ते करलाचा मळा रस्ता करणे, मुस्लिम समाज स्मशानभूमी सुशोभीकरण , भिंत व लादीकरण करणे, निंबवडे रोड ते बबन मेटकरी घर रस्ता करणे, निंबवडे रोड ते गळवेवाडी शिव रस्ता करणे ,प्रताप चव्हाण घर ते प्रदीप पाटील घर रस्ता खडीकरण करणे, महादेव श्रीपती पिंगळे घर ते तमन्ना पवार घर रस्ता करणे, गोपी सपाटे घरचे गणेश नगर जाणारा रस्ता करणे, शिवाजी पवार घर ते अशोक पवार घर रस्ता व गटर करणे, भिंगे दुकान ते बबलू इनामदार घर रस्ता व गटर करणे ,शेटफळे रस्ता ते मुलानगी पर्यंत जाणारा रस्ता करणे, आटपाडी तलावाकडील रस्ता ते जुनी जाधव वस्ती रस्ता करणे, आटपाडी पूल ते नंदेश्वर नगर जाणारा रस्ता करणे, पांढरेवाडी व्यायाम शाळा बांधणे ,सोमेश्वर नगर येथे सोमेश्वर मंदिरासमोर सभा मंडप बांधणे, वडार समाज येथील बालाजी मंदिर सभा मंडप बांधणे, आटपाडी येथील मुस्लिम समाज मज्जिद सभागृह बांधणे, नरहरी समाज मंदिर येथे सभा मंडप बांधणे ,आटपाडी येथील महादेव मंदिरासमोर सभा मंडप बांधणे, गणपती मंदिर येथे सभा मंडप बांधणे शेकदार मळा येथील भैरवनाथ मंदिरासमोर सभा मंडप बांधणे, आटपाडी येथे केमिस्ट भवन सभागृह बांधणे ,आटपाडी येथे डॉक्टर असोशियन एम ए हॉल बांधणे, नाभिक समाज येथे नागोबा मंदिर सभा मंडप बांधणे, परमेश्वर मंदिर येथे सभा मंडप बांधणे, मरीमाता मंदिर ते काळामळा जाणारा रस्ता व सभा मंडप बांधणे, आटपाडी ते पाटील मळा जाणारा रस्ता करणे, ओम शांती कॉलनी येथे रस्ता व गटर करणे, जि प शाळा नंबर एक व दोन खेळणी व सुशिभीकरण करणे, गोरड वस्ती तलावाचे आप्पा गोरड घर रस्ता मुरमीकरण करणे, धन्य निरंकार मठ भिंत बांधणे व सुशोभीकरण करणे, सुरज आपारमेंट ते धांढोर कोडा रस्ता करणे, दादा पिंजारी घर ते दिलीप शिंदे घर रस्ता मुरमीकरण करणे, आटपाडी येथील मुख्य बाजारपेठेतील वर्धन मेडिकल ते एसटी स्टँड पर्यंत रस्ता करणे
असे एकूण 42 कामांना मंजुरी मिळून निधी उपलब्ध झाला आहे .लवकरच वरील कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती अध्यक्ष व सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी दिली.







