कापसाला चांगला दर मिळेल या आशेने शेतकऱ्यांच्या कापूस घरातच
मागील काही दिवसांपासून दरांमध्ये झालीय मोठी घसरण
महेंद्र खोंडे
त-हाडी : मागील वर्षी कापसाला उच्चांकी दर मिळाल्याने शिरपूर तालुक्यातील त-हाडी परिसरातील शेतकऱ्यांनी या वर्षी कापसाच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली याशिवाय राज्यात देखील यावर्षी खान्देशात समवेतच मराठवाड्यात विदर्भ कापसाच्या क्षेत्रात वाढ झाली असून कापसाच्या क्षेत्रात झालेली वाढ लक्षणीय झाली. मागील वर्षी सारखा उच्चांक दर याही वर्षी कापसाला मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी महागातली महाग रासायनिक खते शेणखते तसेच औषधी फवारणी केली परंतु अवकाळी पावसामुळे शेतात पाणी तुंबून राहिल्याने कापसाच्या पहिल्या व दुसऱ्या वेळेस इतर पराठ्या झाल्या कापसावर आलेले सावट यामुळे कापसाच्या उत्पादनात यावर्षी घट झाली आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या मागणीने चांगलाच जोर पकडला आहे. आयात निर्यात बंदीमुळे याचा परिणाम स्थानिक बाजारावर देखील पडत आहे. म्हणूनच कापसाला गेल्या काही दिवसांपासून उतरती कळा लागली आहेत शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस भाव मिळेल या आशेने बोंड बोंड वेचून घरातच शेतकऱ्यांनी भाव वाढीचे अशाने थप्पी मारून ठेवला आहेत.
मागील वर्षीच्या हंगामाच्या कापसाला सुमारे दहा हजार रूपयांच्या वर प्रति क्विंटल एवढा विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला होता. मध्यंतरी कापसाच्या बाजार भावात घसरण नोंदविण्यात आली होती मात्र नंतर भाव पुन्हा एकदा झळकताना नजरेस पडलेत. यावर्षी कापसाला सुरुवातीला नऊ हजार ते नऊ हजार पाचशे रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळाला गेल्या काही दिवसांपुर्वी दरात घसरण होऊन आज रोजी कापसाला आता आठ हजार ते आठ हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल दर सुरु असून अर्धा डिसेंबर महिना सरत आल्यामुळे शेतकऱ्यांनी घरात थप्पी मारून ठेवलेला आहे
कापसाचे भाव वाढीची अशा मावळली असून आता कृषी दुकानदारांनी शेतकऱ्यांजवळ उधारीचा तगादा लावल्याने शेतकऱ्यांनी आता कापूस विक्रीला काढायला सुरूवात केली आहेत.मागील वर्षी शिरपूर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव प्राप्त झाला होता यामुळे कापूस उत्पादक शेतकरी सुखावले. शिवाय फरदड कापसाला देखील चांगला बाजारभाव मिळला होता . परंतु यावर्षी अति पावसाने उत्पन्नात मोठी घट होऊन भाव वाडीत कसर भरून निघेल या आशेवर शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कापूस बोंड बोंड विजून घरात थप्पे मारून ठेवला परंतु भाव वाढण्याऐवजी घसरत चालल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहेत
.
त-हाडी : शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील बाजारतळावर खासगी व्यापार्यांकडून कापसाची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री केली जात आहे.(छाया: महेंद्र खोंडे )







