• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

सुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर धम्म दिक्षा सोहळा……सुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर धम्म दिक्षा सोहळा

माणगंगा by माणगंगा
December 12, 2022
in सांगली
0
सुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर धम्म दिक्षा सोहळा……सुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर धम्म दिक्षा सोहळा

सुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर धम्म दिक्षा सोहळा

आयु विलास खरात

आटपाडी ;

सूर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर

विश्वभुषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांचा जन्म १२/१२/१९१२ रोजी झाला. आज दिनांक १२/१२/२०२२ रोजी जयंती आहे त्या निमित्ताने आटपाडी येथील एक छोटीशी आठवण कथन करीत आहे.

आटपाडी हे गाव औंध संस्थानची राजधानी होती. माणदेशातील प्रमुख गावांमध्ये ओळखले जात असत. सध्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी हा तालुका म्हणून ओळखला जातो आहे. आटपाडी गावातील पुर्वश्रमीच्या अस्पृश्य महार समाज्यातील मंडळी प्रामुख्याने निरक्षर होती, परंतू परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंढरपूर व दहिवडी येथील जाहिर सभा सदर ठिकाणी चालत जाऊन ऐकल्या मुळे व मुकनायक, जनता या वर्तमान पत्राचे वाचन आटपाडीच्या “तवऱ्या” मध्ये ( सध्याचे नालंदाबुध्द विहार ) ऐकले मुळे त्यांच्या विचारात प्रगल्भता आलेली होती.

बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे लाखो अस्पृश्य बांधवाना १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्म दिक्षा दिलेली होती त्या वेळी अंतर लांब असलेमुळे अनेकांना बौध्द धम्म दिक्षा समारंभासाठी जाता आले नाही. त्यामुळे आटपाडी भागातील ३२ गावच्या पुर्वश्रमीच्या महार बांधवानी आटपाडीच्या “तवऱ्या” मध्ये बैठक घेऊन आटपाडी मध्ये सामुदायिक रित्या बौध्द धम्माची दिक्षा घेणेचे निश्चीत करून धम्म दिक्षा सोहळ्यास परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांचे मार्फत धम्म दिक्षा घेणेचे ठरविणेत आले होते.

त्याप्रमाणे आटपाडीच्या “तवऱ्या” मध्ये व समोरील मोकळ्या जागे मध्ये आटपाडी व ३२ गावच्या अस्पृश्य महार समाजातील हजारो बंधु-भगिनींनी दिनांक १४ ऑक्टोबर १९६२ रोजी विजयादशमी च्या दिवशी सन्मानीय यशवंतराव उर्फ भैया साहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत तसेच बौध्दाचार्य व भिकूगणा समोर सकाळी ९ वाजता धम्म दिक्षा सोहळ्यास सुरूवात झाली तथागत भगवान गौतमबुध्द महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलित करून धम्म दिक्षा विधीचा सोहळा सुरू झाला.

सामुदायिक बुध्द वंदना भीम वंदना घेणेत आली. त्यानंतर भैयासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना बौध्द धम्माची दिक्षा देण्यात आली. सर्वांनी ती ग्रहण केली, त्याच बरोबर २२ प्रतिज्ञा देण्यात आल्या. जमलेल्या हजारो बांधवांना बौध्द धम्माची माहिती देण्यात आली. त्यानंतर जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. धम्म दिक्षेचा कार्यक्रमानंतर सर्वांचे चेहरे उजाळले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फार मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. फाटका-
तुटक्या पेहरावात स्वाभिमानाने उभे राहिलेले होते.

दुपारी आटपाडीच्या “तवन्या” च्या मोकळ्या जागेमध्ये “कायली” मध्ये खीर केलेली होती. ती सर्वांनी आनंदानी भोजन केले त्यानंतर आटपाडीच्या पेठे मधून तथागत गौतमबुध्द बोधिसत्व डॉ बाबासाहब आंबेडकर यांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक बैलगाडीतून काढणेत आली होती. बैलगाडीस फुले, नारळाची पाने, केळीची झाडे लावणेत आली होती. बैलगाडी मध्ये प्रतिमा जवळ भैयासाहेब आंबेडकर यांना बसवून पारंपारिक वाद्ये हलगी, घुमके, लेझीम, वाद्याने आटपाडी गावातून प्रचंड मोठी मिरवणूक काढणेत आली होती. जयजयकाराच्या घोषणेने परिसर दणाणून सोडलेला होता..

सदर संपूर्ण सोहळ्यास भैयासाहेब आंबेडकर उपस्थितीत होते. अशा प्रकारे आटपाडी येथे दि. १४ ऑक्टोबर १९६२ रोजीचा धम्म दिक्षा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करणेत आला होता. आटपाडीकरांच्या दृष्टीने सदरचा सोहळा सुवर्ण अक्षरात गणला गेलेला आहे. आज रोजी यशवंतराव उर्फ भैयासाहेब भिमराव आंबेडकर यांची जयंती आहे म्हणून त्यांना विनम्रपणे अभिवादन करणेत येत आहे. त्यांच्या जयंती निम्मीत्त हा छोटासा लेख सादर करीत आहे…

कळावे.

दिनांक :- १२/१२/२०२२

आयु. विलास खरात, आटपाडी.

मो. नं. ९२८४०७३२७७

Views: 162
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
मागाठाणे येथे विविध कार्यक्रमांचा आ. प्रविण दरेकरांच्या हस्ते शुभारंभ

मागाठाणे येथे विविध कार्यक्रमांचा आ. प्रविण दरेकरांच्या हस्ते शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)