माणगंगा न्यूज बातमीचा परिणाम
अखेर विभूतवाडीतील शेतीपंपाचा विद्युत पुरवठा , महावितरणने जोडला,शेतकरी वर्ग समाधानी
विभूतवाडी ता. आटपाडी येथील शेती पंपाचा मागील सहा महिन्यापासून विद्युत पुरवठा बंद होता परंतु सेवन स्टार च्या बातमीने विद्युत पुरवठा महावितरण ने जोडला आहे त्यामुळे माणगंगा न्यूज चे व महावितरणचे आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत अशी प्रतिक्रिया युवा नेते शंकर खर्जे यांनी दिली
याबाबत सविस्तर माहिती अशी की विभूतवाडी ता. आटपाडी येथे सहा महिन्यापूर्वी वादळाचा तडाखा बसला होता .या वादळाच्या तडाक्यामध्ये सलग चार दिवस विद्युत पंप व घरगुती लाईट बंद होती. वृक्ष उन्मळून पडले होते ,अनेकांच्या घरांचे नुकसान झाले होते, अनेकांच्या घराचे पत्रे उडाले यामध्ये अतोनात नुकसान झाले होते. त्यातच विभूतवाडीतील खर्जे मळा येथील उंबराची विहीर व खर्जे विहीर याकडे गावातून जाणारा विद्युत पुरवठा विद्युत वाहिन्या पडल्याने खंडित झाला होता.
याबाबत विभूतवाडीतील शेतकरी शंकर खर्जे यांनी अनेक वेळा महावितरण कडे विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी विनंती केली, परंतु गेले सहा महिने पासून अद्याप विद्युत पुरवठा सुरू केला नाही. त्यामुळे खर्जे मळा येथील दोन्ही विहिरीवरील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे .
विद्युत वाहिनी बंद असल्याने मोटारी बंद होत्या
विहिरीमध्ये पाणी भरपूर असून देखील पाणी उपसा करायचा कशाने हा गंभीर प्रश्न होता ,परंतु याकडे महावितरण जाणून-बुजून दुर्लक्ष करीत होते, गेल्या सहा महिन्यापासून विद्युत वाहिन्या बंद असल्याने जवळपास 50 एकर क्षेत्र पडून आहे,
याबाबत आठ ते दहा दिवसाच्या आत मध्ये विद्युत वाहिन्या न जोडल्यास महावितरण च्या समोर कोणतीही सूचना न देता बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा नेते शंकर खर्जे यांनी दिला होता
याची दखल घेऊन व प्रसिद्धी माध्यमाने प्रसिद्ध केलेल्या बातम्यांची दखल घेऊन महावितरण ने शेतीपंपाचा विद्युत पुरवठा पूर्ववत केला आहे, सुरू केला आहे .त्यामुळे सर्व प्रसिद्धी माध्यमाचे व महावितरण चे मी मनःपूर्वक आभारी आहे अशी प्रतिक्रिया शंकर खर्जे यांनी दिली.







