विभूतवाडी येथील शेतू आणखीन किती जणांचे प्राण घेणार बांधकाम विभागाचे डोळे केव्हा उघडणार रस्त्याचं वाकड शेपूट सरळ कधी होणार
आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी गावाच्या पश्चिमेला असलेल्या पुलाजवळ आज दुपारी दोनच्या सुमारास निंबवडे येथून ऊस भरून पडळ तालुका खटाव कडे जाणारा उसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टर व उसाचे असे एकूण दोन लाखाच्या आसपास नुकसान झाले आहे मात्र हे अपघात याठिकाणी नित्याचच बनला आहे या ठिकाणी वर्षातून साधारणपणे नऊ ते दहा अपघात होतात यामध्ये अनेक जणांचे जीवही गेलेले आहेत
आर्थिक नुकसान वेगळं आहे मात्र हे सर्व होत आहे ते बांधकाम विभागाने रस्त्याचं चुकीचं डिझाईन बनवल्यामुळे हा रस्ता पंढरपूर येथील बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये येतो मात्र येथे सतत होत असलेले अपघात याकडे या विभागाचे कायमचे दुर्लक्ष आहे या गावातील नागरिकांनी या विभागाकडे अनेक वेळा मागणी करून सुद्धा या विभागाने कोणतेही पाऊल उचललेले नाही त्यामुळे येथील अपघाताची मालिका सुरूच आहे आणि हे अपघात आणखी किती दिवस होतच राहणार असा सवाल सामान्य नागरिकांतून विचारला जात आहे जोपर्यंत येथे प्रतिष्ठित आणि मोठ्या व्यक्तीचा अपघात होत नाही तोपर्यंत दखल घेतली जाणार नाही असंच येथील नागरीक ्वेषाने बोलत असतात या ठिकाणी होत असलेल्या अपघाताने अनेक परिवारांना याची मोठी किंमत मोजावी लागली आहे
आर्थिक तसेच अवयव गमून व जीवाला हकनाक मुकुंन मुंबई येथील मंत्रालयामध्ये वातानुकूलित कार्यालयामध्ये बसून मोठा पगार घेणारे अधिकारी जनतेच्या सुख सोयी संबंधी योजना आखतात मात्र त्या योजना फक्त सांगण्यापुरत्याच असतात असंच येथील नागरिक खाजगी मध्ये बोलत आहेत
पुढ्यावरती पूल आहे हा पूल पंढरपूर कराड या महामार्गावर ती आहे गावातून बाहेर निघाल्यानंतर इंग्रजी एस अक्षरासारखे वळण आहे त्यामुळे या ठिकाणी सतत अपघात होत आहेत







