आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मुजु तांबोळी
कार्याध्यक्ष पदी लक्ष्मण सरगर,उपाध्यक्ष पदी सदाशिव पुकळे यांची निवड
आटपाडी/प्रतिनिधी
आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै तरुण भारतचे मुजू तांबोळी यांची एकमताने निवड करण्यात आली.कार्याध्यक्षपदी लक्ष्मण सरगर यांची तर उपाध्यक्ष म्हणून श्री.सदाशिव पुकळे यांची निवड करण्यात आली. यावेळी आटपाडी तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते.
यावेळी संघटनेच्या सचिव पदी सुरेश मोकाशी, खजिनदार पदी बिपीन देशपांडे यांची निवड करण्यात आली.निवडी प्रसंगी सादिक खाटीक, किशोर पुजारी,सतीश भिंगे, प्रशांत भंडारे, नागेश गायकवाड, सुरज मुल्ला, कांतीलाल कारळे, दिपक प्रक्षाळे, गणेश जाधव, सुरेश मोकाशी, अशोक पवार, विक्रम भिसे, शिवानंद क्षीरसागर, अमोल काटे, बिपीन देशपांडे, सचिन कारंडे उपस्थित होते







