शिवसेना शिंदे गटाचे आम्अनिल बाबर 2024 ची निवडणूक लढवणार नाहीत _ आम. गोपीचंद पडळकर यांचा गौप्यस्फोट
आमदार गोपीचंद पडळकर बोलताना म्हणाले मी 2019 ला बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवीत होतो. त्यावेळेला आमदार बाबर व त्यांचे पुत्र अमोल बाबर यांनी बारामतीच्या क्लब हाऊस मधील पहाटेच्या बैठकीत मला 2024 ला तुमच्या पाठीशी रहात असल्याचा शब्द दिला होता, तो शब्द आता ते पिता-पुत्र पाळतील.
त्यामुळे बाबर हे खानापूर आटपाडी मतदारसंघातून 2024 ची निवडणूक लढवणार नाहीत असा गौरव्यस्पोट आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर हे मोही ता.खानापूर येथील ग्रामपंचायतच्या नूतन सरपंच व सदस्यांच्या सत्कार समारंभासाठी आले असता, त्यांनी सांगितले की 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बारामती येथे आमदार अनिल भाऊ बाबर व त्यांचे पुत्र अमोल बाबर यांच्या मध्ये पहाटेच्या झालेल्या बैठकीचा उलघडा केला.
आमदार पडळकर म्हणाले खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार अनिल बाबर हे केवळ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळे 2019 ला आमदार झाले आहेत
मी बारामती मधून निवडणूक लढवीत असताना आमदार व त्यांचे जेष्ठ पुत्र अमोल बाबर हे पहाटे पाच वाजता बारामती क्लब हाऊसला मला भेटण्यासाठी आले होते त्यावेळेला अमोल बाबर यांनी अनिल भाऊंचे वय झाले आहे. त्यामुळे आमची आता ही शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले व कसल्याही परिस्थितीमध्ये 2019 ला अनिलभाऊंना आमदार करा पुढील 2024 च्या निवडणुकीमध्ये आम्ही तुमच्या पाठीशी राहु असा शब्द बाबर पिता-पुत्रांनी दिला होता
त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता गडबड करू नये ,मी त्यांचे काम केले आहे. त्यांनी 2024 ला माझे काम करावे असा गौप्स्फोट आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे यामुळे संपूर्ण खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्येच नव्हे तर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे.







