स्पर्धा परिक्षेनंतर आदर्श शिक्षीका बनल्यात मंत्रालय कक्ष अधिकारी…..
ऋतुजा यांची ‘कक्ष अधिकारी पदी पदोन्नती , सर्वच स्थरातून कौतुक…
औरंगाबाद /प्रतिनिधी दि.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भवानीनगर, वाई येथे आदर्श शिक्षिका म्हणून काम केलेल्या ऋतुजा गवळी-कलवले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग सहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षा- २०१२ बॅचच्या अधिकारी आहेत. शिक्षक म्हणून काम करताना त्यांनी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून मंत्रालयात कक्ष अधिकारी या पदाची ही उंची गाठली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .
महाराष्ट्र लोकसेवा आयोग सहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षा- २०१२ बॅचच्या अधिकारी मूळच्या सातारा जिल्ह्यातील वाई येथील आहेत. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भवानीनगर, वाई येथे आदर्श शिक्षिका म्हणून काम केले आहे. त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग सहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षा- २०१२ बॅचच्या अधिकारी आहेत.
शिक्षक म्हणून काम करताना त्यांनी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून पदाची ही उंची गाठली आहे. आजच्या तरुण पिढी समोर त्यांनी कष्टातून यश साध्य करता येते आदर्श समोर ठेवला आहे.उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई येथे सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती ऋतुजा गवळी- कलवले यांच्या कक्ष अधिकारी या राजपत्रित पदावरील पदोन्नतीचे आदेश शासनाने जारी केले आहेत. कक्ष अधिकारी पदावरील त्यांची पदस्थापना महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.
अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या श्रीमती ऋतुजा यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर मंत्रालय प्रशासनात आपले प्रभुत्व सिद्ध केले आहे. याचीच पोच पावती म्हणून सामान्य प्रशासन विभागाने त्यांची नेमणूक महसूल व वन विभागात केली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल अप्पर मुख्य सचिव श्री नंदकुमार, रोहयों, त्यांचे पती श्री विजयकुमार कलवले, सहाय्यक संचालक, रोहयो, राजू पवार (स. सं.) गृह विभाग, समीर शेख पोलीस अधीक्षक डिजी ऑफिस, विकास थोरात, अवर सचिव, जलसंधारण, रोहिदास कलवले (पत्रकार) महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब काळे , राष्ट्रीय संर्पक प्रमुख बाबासाहेब सोनवणे , राष्ट्रीय संघटक बाबुलाल राठोड , राष्ट्रीय सहसंघटक साजिद पठाण , पत्रकार सदाशिव फुले फुलंब्री तालुका अध्यक्ष राधेशाम हिवाळे , अजिंक्य काथार , अशोक बर्डे , सुधाकर जेठे , अकबर शहा , अमोल कोलते , सरफराज , अमोल दणके , अदिनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच श्रीमती ऋतुजा गवळी – कलवले यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.







