विविध मागण्यासाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेची लोकसभा अध्यक्षांची भेट
वार्ताहर मोलगी ता. अक्कलकुवा :- महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने अध्यक्षा मायाताई परमेश्वर यांच्या नेतृत्वातखाली दिल्लीत लोकसभेचे अध्यक्ष मा. ओम बिर्लाजी लोकसभा अध्यक्ष यांची भेट घेतली.यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या मायाताई यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या व्यथा ओम बिर्ला यांच्या पुढे मांडून त्यावर यावेळी चर्चा सविस्तर करण्यात आली.
यात
केंद्र सरकार मार्फत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरघोस मानधन वाढ देण्यात यावी.केंद्र सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना चांगल्या दर्जाचे व नवीन मोबाईल तात्काळ पुरवावेत.प्रत्येक राज्यात तेथील मातृभाषेप्रमाणे मोबाईल ट्रॅकर 100 % मातृभाषेत असावा.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्राज्युटी लागू करण्यात यावी.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करण्यात यावी.
या महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करून तात्काळ हे प्रश्न सभागृहात चर्चेला घेऊन सोडविले जातील असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेला आश्वासन दिले.







