विभूतवाडीत ऊस ट्रॅक्टर ट्रॉली ची पलटी
दोन लाखाचे नुकसान,कोणतीही जीवित हानी नाही
आटपाडी प्रतिनिधी
विभूतवाडी ता. आटपाडी येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टरच्या दोन्ही ट्रॉल्या पलटी झाल्या आहेत.यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु दोन्ही ट्रॉली उसासहित पलटी झाल्याने सरासरी दोन लाखाचे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की कराड पंढरपूर महामार्गावर विभूतवाडीच्या पश्चिमेला दोन किलोमीटर वर पवार वस्ती येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर चढ चढत असताना ट्रॅक्टरला चढ न चढल्याने ट्रॅक्टर मागे सरकला व दोन्ही ट्रॉल्या पलटी झाल्या आहेत.
सर्वसाधारणपणे सहा ते साडेसहाच्या दरम्यान महामार्गावरती ट्रॉल्या पलटी झाल्याने दीड ते दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या रांगांच्या रांगा लागल्या होत्या त्यानंतर जेसीबीच्या साह्याने साठेसात च्या दरम्याने ट्रॉल्या व ऊस बाजूला सरकवण्यात आला. त्यानंतर थोडीफार वाहतूक सुरू झाली.
ट्रॉली पलटी झाली त्याच्या पूर्वेला 50 ते 60 वाहनांची रांगा लागल्या होत्या, तर पश्चिमेलाही 60 ते 70 वाहनांच्या रांगा लागल्या होत्या , जवळपास दीड ते दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली ची ह्या आठ दिवसांमध्ये पलटी होण्याची दुसरी वेळ आहे. तर एका ट्रॉलीचा टायर निसटला होता.
तर झरे येथे सुसाट जाणाऱ्या टँकरने एका महिलेचा जीव घेतला या महामार्गावरती आठ ते दहा दिवसांमध्ये तीन ते चार अपघात झाले. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देणार का नाही किंवा आणखी या महामार्गावरती किती जीव घेणार आहेत .
अशीच अपघाताची मालिका राहिली तर अनेकांचे नुकसान होणार आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने अचानक असणारे वळण अचानक असणारे चढ अचानक असणारे उतार काढण्याची गरज आहे व अनेक ठिकाणी गतिरोधक टाकण्याची गरज आहे असे असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम याकडे दुर्लक्ष करीत आहे.






