सरपंच – सदस्य, “आमदार ” होण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करा .
सादिक खाटीक यांची मागणी .
_______________
आटपाडी दि . २ ( प्रतिनिधी )
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या जागांचा कोटा रद्द करून यापुढच्या काळात ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यामधून १२ आमदार निवडले जावेत म्हणून स्वतंत्र मतदार संघ आरक्षीत करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे महासचिव सादिक खाटीक यांनी केली आहे .
राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर – आटपाडीचे नेते, मणगंगा उद्योग समुहाचे प्रणेते आनंदरावबापू पाटील यांच्या पुढाकाराने व त्यांच्या हस्ते हिवतड तडवळे यप्पावाडी ग्रामंचायती च्या सरपंच सदस्यांचा फेटा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून सत्कार करणेत आला त्याप्रसंगी सादिक खाटीक बोलत होते .
तालुक्याच्या भाळी असलेला दुष्काळाचा कलंक मिटविताना क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी, डॉ . भारत पाटणकर यांचे नेतृत्वाखाली कृष्णामाईला आपल्या भागात आणताना त्यांचा निष्ठावान साथी होता आल्याचे भाग्य आपण मिळवू शकलो, अशा भावना व्यक्त करून आनंदरावबापु पाटील यांनी, गत ४० वर्षाच्या कार्य प्रणालीचा आढावा घेत, सत्कार मुर्तीना उद्देशुन, गावचे कुटूंब असलेल्या ग्रामपंचायती वर कर्ते म्हणून निवडून आल्याने तुम्ही सर्वच गावचे झाला आहात. पक्षीय भेद बाजुला ठेवून सर्व गाव माझा, सर्वच माझी माणसे. या भावनेने एकजुटीने काम करीत गावात आदर्श निर्माण करा. असे शुभेच्छा पर आशिर्वाद आनंदराबापु पाटील यांनी यावेळी बोलताना दिले .
वाडी, वस्ती, खेडे, गाव, समृद्ध झाले तरच तालुका, जिल्हा, राज्य, देश समृद्ध होणार आहे . प्रत्येक गाव औद्योगिकीकरणाने सक्षम करताना राज्य शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला १ ते ५ कोटी रुपये विकासनिधी प्रतिवर्षी उपलब्ध करून देणारे नवीन धोरण स्विकारावे . असे स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी, तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य, सरपंचानी अभ्यासू – डोळस बनत गावा बरोबर तालुक्याच्या विकासासाठी संघटीत व्हावे . अशा अपेक्षा ही सादिक खाटीक यांनी व्यक्त केल्या .
डाळींब क्रांती, शेत तलाव उभारणीची चळवळ, बांबू लागवड, नवनवीन भाजीपाला, फळ फळावड लागवड, शेती – शेती पुरक नवनवीन उपक्रम , शैक्षणीक विश्वाबरोबर आटपाडीसह अन्य तालुक्यात कृष्णामाईला आणण्यात निरपेक्ष भावनेने गत अनेक वर्षात आनंदरावबापू पाटील यांनी लक्षवेधी योगदान दिले आहे . बापूंसारखे आटपाडी तालुक्यातील सर्वस्पर्शी, सर्वप्रिय, सर्वमान्य, सर्वसंपन्न, सर्वोत्तम आणि सर्वसमावेशक व्यक्तीमत्व आमदार झाले पाहीजेत . आनंदरावबापू पाटील अथवा फलटण तालुक्यात गत २० वर्षात नावारूपाला आलेले हिवतडकर संजय देशमुख यासारखे आटपाडी तालुक्यातील अन्य कोणतेही कर्तृत्वसंपन्न व्यक्तीमत्व आमदार झाल्यास ते सर्वांच्या दृष्टीने आनंददायीच ठरेल . असेही शेवटी सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले .
हिवतड वाशीय आणि तालुक्याच्या जनतेच्या आशिर्वादाने फलटण तालुक्यातील कोळकी गावचे एक तपाहून जास्त काळ नेतृत्व करता आले . कोळकीच्या सरपंच राहीलेल्या पत्नी सौ. रेश्मा यांना विभागीय, राज्य पातळीवर काम करण्याची संधी लाभली ती त्यांच्या अमोघ वक्तृत्व शैलीतून . अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष संजयदादा देशमुख यांनी व्यक्त केल्या .
यावेळी मॉडर्न शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अजित चव्हाण सर, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित चव्हाण, हिवतडचे सरपंच आनंदराव देशमुख सर, ज्येष्ट नेते कमलाकर देशमुख, आनंदराव चव्हाण सर वगैरे मान्यवरांची भाषणे झाली .
यावेळी अभियंता मनोज पाटील, राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी ओबीसीचे तालुका अध्यक्ष जालींदर कटरे, हिवतडचे सरपंच आनंदराव देशमुख, तडवळेचे सरपंच जितेंद्र गिड्डे, यप्पावाडीचे सरपंच संभाजीराव माने, तळवळेचे बाळासाहेब गिड्डे, गणेश देशमुख धुळा ठेंगले बनपूरी, यप्पावाडीचे आकाराम मोरे, जयश्री चव्हाण, उज्वला चव्हाण, धनश्री चव्हाण, आकाश तळे, तडवळेचे दीपक कोडग, सुशिल गिड्डे, माणीक मोटे, शिवकन्या गिड्डे, शैलजा पावले, हिवतडचे संतोष कोळी, स्वाती सावंत, आशा पवार, शांता मंडले, गणपती देशमुख, सुनिल कोडग, शंकर गळवे इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते . शेवटी जालींदर कटरे यांनी आभार मानले .






