सहकार भारती धुळे जिल्हा ग्रामीण च्या महिला अध्यक्ष पदी.जयश्री रावसाहेब चव्हाण यांची निवड
तऱ्हाडी:-जनता सह बॅंक धुळे येथे सहकार भारती ची उत्तर महाराष्ट्र विभाग पदाधिकारी यांची बैठक डाॅ शशी ताई अहिरे प्रदेश अध्यक्षा व उतर महाराष्ट्र विभाग संघटन प्रमुख दिलीप लोहार यांचे उपस्थित संपन्न झाली
या बैठकीत धुळे जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्ष म्हणुन तऱ्हाडी वि.का.सोसायटीचा संचालिका जयश्री रावसाहेब चव्हाण त्यांची नेमणुक
महाराष्ट्र प्रदेश सहकार भारती चा अध्यक्षा डाॅ शशी ताई अहिरे यांनी आजच्या बैठकीत निवड केली
डाॅ शशीताई अहिरे यांनी सहकार भारती चा कार्याची माहिती दिली व सहकार क्षेत्रात अमुलाग्र बदल सहकार भारती चा माध्यमातून होत असुन सहकार भारती चा संघटनेची शक्ती चा अनुभव येत आहे
दिलीप लोहार यांनी विभागातील प्रत्येक तालुक्यातील गाव पातळीवर संघटन विस्तार व सहकार क्षेत्रात चागले काम करणारे व्यक्ती व संस्था यांना जोडण्यासाठी पदाधिकारी यांनी काम केले पाहिजे आगामी काळात सहकार भारती चा दि.11 जानेवारी स्थापना दिन प्रत्येक तालुकास्तरावर साजरा करण्यात येणार आहे व दि. 8 मार्च महिला दिन मोठ्या प्रमाणावर सहकार भारती तर्फे साजरा करण्यात येणार आहे.
या बैठकीत वि.का सोसायटीचे प्रकोष्ठ प्रमुख प्रकाशसिह सिसोदिया, धुळे जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष संग्रामसिंग राजपूत, धुळे महानगर अध्यक्ष आशिष अग्रवाल,नंदुरबार जिल्हा अध्यक्ष कालिदास पाठक, संघटन प्रमुख महादु हिरणवाले, जळगांव संघटन प्रमुख अॅड विकास देवकर,
विजय मंगळे, डाॅ दरबारसिंग गिरासे, कृष्णा जाधव, शशीकांत चौधरी, शिदखेंडा येथील गोटुआप्पा महाले, सुभाष पाटील, साबळेताई,किशोर माळी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली यांच्या निवडीबद्दल तऱ्हाडी येथील तापी परिसर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे उपाध्यक्ष निंबा नंथू भामरे माजी सरपंच सुदाम भलकार लोकनियुक्त सरपंच जयश्री धनगर.सुनिल धनगर . गट नेते तुळशीराम भामरे वि.का.सोसा.चे चेअरमन प्रा.प्रशांत पाटील.व्हा चेअरमन प्रा.उदयकुमार भलकार सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले







