अखिल विश्व महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत बिडकरबाबा यांचे निधन
आज सायंकाळी ४ वाजता रनाईचे (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे होणार अंत्यविधी
नागपूर, ता. ६ जानेवारी :- महानुभाव पंथातील प्रमुख आचार्य महंत श्री वर्धनस्थ बिडकरबाबा (संचालक- प्रणवाश्रम रनाईचे) यांचे ८२ व्या वर्षी आज पहाटे ३ वाजता निधन झाले. आज सायंकाळी ४ वाजता रनाईचे (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे होणार अंत्यविधी होणार असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.
संपूर्ण भारतभर लाखोंच्या संख्येने बाबांचा शिष्यपरिवार आहे. महानुभाव पंथातील १३ प्रमुख आचार्य परंपरेतील मुख्य महंत बाबाजी होते. अखिल विश्व महानुभाव परिषदेचे अध्यक्ष बाबा होते, तर अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे मार्गदर्शकही होते. बाबांच्या जाण्याने पंथ पोरका झाल्याची भावना महानुभावांत व्यक्त होत आहे.
(वृत्त प्रेषक:- हरिहर पांडे, नागपूर 9623802020)







