प्रतापुरच्या उपसरपंचपदी बाळासाहेब खांडेकर यांची वर्णी.
माणगंगा न्यूज पोर्टल जत:-
जत तालुक्यातील प्रतापुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्री.बाळासाहेब पांडुरंग खांडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सरपंच श्री.तुकाराम खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड झाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विशाल नागने व ग्रामसेविका एस.व्ही.कुंभार यांनी काम पाहिले.
यावेळी नूतन सदस्यांमध्ये संगीत बाबासो खांडेकर,सुलाबाई बबन खटके,संगीत माणिक हेगडे व सद्दाम बालोखान सोनिकर.यांचा ग्रामपंचायतीमध्ये सत्कार करण्यात आला.निवड होताच कार्यकर्त्यांनी सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचा हार घालून, पुष्पगुच्छ देऊन व गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला.नूतन सरपंच,उपसरपंच, सदस्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.







