जिजाऊ जयंती निमित्त
महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माउलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा…
आई ही जगातील सर्वात मोठी गुरु आणि योद्धा असते. यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ होय.
राजमाता जिजाऊ भोसले यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लाखुजीराजे जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई होते.इ.सन 1605 मदत त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.
शहाजीराजे व जिजाबाई यांच्या पोटी दोन पुत्र रत्नांनी जन्म घेतला. थोरले पुत्र संभाजी राजे शहाजी राजांजवळ वाढले तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाऊ वर होती. त्यांनी शिवरायांना लहान वयातच शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या. त्यांना पराक्रम, ज्ञान, चातुर्य, संघटन अशा सद्गुणांचे बाळकडू दिले. युद्ध कला, शस्त्रविद्येत त्यांना पारंगत केले. त्यांनी शिवरायांना लोककल्याणकारी राजा बनवले. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्वप्न शिवराय मध्ये बघितले.
6 जून 1674 मध्ये शिवरायांचा स्वराज्याचे छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला आणि माता जिजाऊंची स्वप्न साकार झाले. जिजाऊंनी दिलेल्या संस्कारामुळे शिवाजी महाराज राजे झाले. जिजाऊ न्याय निवाडा करत असत.
जिजाऊ ह्या काही साधारण स्त्री नव्हत्या. त्यांनी मावळ्यांच्या रक्तात स्वाभिमान भिनवला त्यांनी प्रत्येक मावळ्यात शिवबा घडवला. त्यांनी वेळोवेळी पत्नी म्हणून शहाजीराजांना धीर दिला. त्यांनी शिवबाच्या मातृत्वा बरोबरच गुरुत्व स्वीकारले. माता ही खरंच एक कलावंत असते. तिने दिलेले ज्ञान हे एखाद्या ग्रंथ पेक्षाही पवित्र आणि प्रभावशाली असते. ती आपल्या मुलाला घडविण्याची कामगिरी करत असते. तशीच कामगिरी या मातेने केली. त्यांनी आपल्या ज्ञानाने बोधाने शिवबांना राम, कृष्ण यांच्या कथा सांगून इतके प्रभावशाली बनवले की त्यांनी स्वराज्य स्थापना केली.
त्यांनी स्त्री ही क्षणकालाची पत्नी व अनंत काळाची माता असते हे प्रत्यक्षात खरे करून दाखवले. त्यांनी शिवरायांना राजकारण व शस्त्र विद्येत देखील कुशल बनवले. शिवरायावर उत्तम संस्कार केले. सर्वांना समान व योग्य न्याय देण्याचे धडे दिले. त्यामुळे स्वराज्यात कधीही कोणत्याही माणसावर अन्याय झाला नाही. जिजाऊंनी शिवरायांना आयुष्यभर प्रेरणा दिली.
त्यांचे विचार, त्यांचे धोरण, त्यांचा न्याय, त्यांचा धाडसी स्वभाव, त्यांची धडाडी आणि त्यांचे व्यक्तिमत्व हे सारे अतुलनीय आहे. शिवाजी महाराज जे घडले ते केवळ जिजाऊ मुळेच. आपली स्वप्न त्यांच्या मनात उतरून नव्हे तर त्यांच्याकडून पूर्ण करून घेण्याचं सामर्थ्य त्याच माऊलीचं होते. तेवढ्यासाठी त्यांनी शहाजीराजे गेल्यावर आईच्या सती जाण्याला विरोध केला होता.
त्यांनीही लेकराच्या प्रेमाखातर आपलं सती जाण बाजूला ठेवून माघारी वळल्या. आणि शिवबा कडून स्वराज्य निर्माण करून घेतल. जेव्हा जेव्हा राजे अस्वस्थ व्हायचे.आडचणीशी सामना करताना विचलित व्हायचे. तेव्हा तेव्हा जिजाऊ माउलीने त्यांचे बळ वाढवलं आणि राजे पुन्हा नव्याने ताज्या दमाने संकटाला सामोरे गेले.
राजांना घडवणं म्हणजे त्यांच्या मातृत्वाला मोठं आव्हान होतं. असा राजा महाराष्ट्राला दिला की एवढे कर्तुत्व करूनही कधी गर्वाची किनार त्यांना शिवली नाही. हा राजा लोक कल्याणासाठीच घडवला होता धन्य ती माऊली जिने आपलं सर्वस्व पणाला लावलं. अशा या थोर मातेची प्राणज्योत 17 जून 1674 रोजी मालवली. या थोर मातेस विनम्र अभिवादन…
1:- जिजा माऊली गे तुला वंदना ही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त दाही..
भयातून मुक्ती मिळाली जणाला गुलामी कुणाला कुणाचीच नाही…
जशी पार्वती ती प्रिया शंकरास तशी प्रेरिका घे शहाजीस तु ही…
जिजा माऊली गे तुला वंदना ही…!
2 :-
थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी ना फिटणार…
चंद्रसूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार…!
ललिता महेंद्र खोंडे त-हाडी
भोलेनाथ नगर अभानपुर रोड प्लॉट नंबर २० त-हाडी
मोबाईल ९४२१९२९३६०







