खरसुंडीत अवैध सागवानाचा लाकडी साठा जप्त
आटपाडी वनविभागाची दमदार कामगिरी
आटपाडी प्रतिनिधी
खरसुंडी ता.आटपाडी येथे वन विभागाने कारवाई करत सागवान लाकडाचा साठा जप्त केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की खरसुंडी गावच्या हद्दीतील किरण सुखदेव पुजारी यांचे मालकी गट क्रमांक 140 या खाजगी क्षेत्रात अज्ञात इसमाने विनापरवाना बिगर पासी, बिगर शिक्का, अवैधरित्या सागवान या मौल्यवान प्रजातीचे अनगड नग 66 घनमीटर 2. 584 सरकारी माल किंमत 30 हजार 230 रुपये किमतीचा मालवाहतूक करून ठेवलेला आढळून आले आहेत.
भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41 व 42 अन्वये वनविभागाचे वनपाल पांडुरंग खूपसे, -वनरक्षक ज्योती घागरे व वन कर्मचारी यांनी कार्यवाही करून वन गुन्हा नोंद केला असून माल जप्त करून संरक्षणासाठी ताब्यात घेऊन आटपाडी डबई कुरण येथे ठेवलेला आहे.
पुढील अधिक तपास उप वनसंरक्षक निता कट्टे, व सहायक वन संरक्षक डॉ.अजित साजने सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.
चौकट – वृक्ष तोड अनेक दिवसापासून होत होती. वन विभाग बरेच दिवसापासून सापळा रचत होते. परंतु त्यांच्या हाती काही लागत नव्हते. परंतु या वेळेला वन विभागाला यश मिळाले आहे. वनविभागाच्या या कारवाईमुळे बाकीच्या वृक्षतोड करणारास चाप बसू शकतो.
फोटो – सागवान लाकडाचा जप्त केलेला साठा आटपाडीतील मुख्य कार्यालयामध्ये ठेवण्यात आला आहे







